बॉलिवूड दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ब्रह्मास्त्र रिलीजसाठी सज्ज झाला आहे. रिलीजपूर्वीच सर्वत्र ब्रह्मास्त्रची जोरदार चर्चा होत आहे. बॉलिवूड सुपरस्टार आलिया भट्ट (Alia Bhat) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचा हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीची व्याख्याच बदलून टाकेल असा विश्वास आहे. पण रिलीजपूर्वीच ब्रह्मास्त्रने हे सिद्ध केले आहे की कमाईच्या बाबतीतही अयानचा हा सिनेमा अनेक विक्रम करेल. आता बातमी येत आहे की ब्रह्मास्त्रच्या रिलीजपूर्वीच एक लाखाहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.
विशेष म्हणजे 410 कोटी खर्चून बनलेला ब्रह्मास्त्र बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक हिट होण्याच्या इराद्याने प्रदर्शित होणार आहे. वेगवान चित्रपटाच्या प्री बुकिंगमुळे रणबीर कपूरचा चित्रपट पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करू शकतो असे अंदाज लावले जात आहेत. खरं तर चित्रपट समीक्षक सुमित खंडेल यांनी अलीकडेच त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ब्रह्मास्त्रच्या प्री बुकिंगची माहिती सादर केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ब्रह्मास्त्र चित्रपटाची 1 लाखाहून अधिक तिकिटे रिलीजपूर्वी विकली गेली आहेत. इतकच नाही तर आतापर्यंत ब्रह्मास्त्र चित्रपटाने रिलीज न होता 6 कोटींची कमाई केली आहे. हे पाहता ब्रह्मास्त्र हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो असा देखील अंदाज वर्तविण्यात येतोय.
इतकच नव्हे तर कोरोना महामारीनंतरही पहिल्या दिवशी सर्वाधिक बॉक्सऑफिस कलेक्शनच्या बाबतीत अयान मुखर्जीचा ब्रह्मास्त्र चित्रपट हा इतर बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकू शकतो.