मनोरंजन

अभिनेता श्रेयस तळपदेची चौकशी होणार?

Published by : Lokshahi News

सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे नुकताच त्याच्या आगामी मालिकेसाठी चर्चेत आला होता.श्रेयस तळपदे बऱ्याच वर्षानंतर मालिकाक्षेत्रात पदार्पण करणार आहे.मात्र आता तो वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत येताना दिसतोय.मालकाच्या विनापरवानगी अलबत्याचा गलबत्या नाटकाचा सेट वापरून कमर्शिअल शूटिंगसाठी करण्याचा आरोप श्रेयसवर होतोय.

प्रकरण काय आहे?

कोरोनाच्या प्रभावामुळे लॉकडाऊन काळात सर्व थिएटर सहित नाट्यसृष्टी बंद आहे. त्यामुळे अलबत्या गलबत्या या नाटकाचा सेट प्रवीण भोसले यांच्या गोडाऊन मध्ये कोळसा बंदर, काळा चौकी येथे ठेवण्यात आला होता.मात्र तो सेट कोणतीही पूर्वकल्पना न देता सुरेश सावंत यांनी गोडाऊन मालकास खोटे सांगून गोडाऊन मधून चोरून श्रेयस तळपदे यांच्या OTT प्लॅटफॉर्म च्या भक्षक या प्रोजेक्ट साठी वापण्यात आला.

महाराष्ट्रभर नाट्यगृह चालू ठेवण्यास मनाई असताना देखील लॉकडाऊन काळातील शासनाच्या नियमाचे उल्लंघन करत, बेकायदेशीररित्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे अलबत्याचा गलबत्या नाटकाचा सेट वापरून हे कमर्शिअल शूटिंगसाठी करण्यात आले.

अलबत्या गलबत्या या नाटका निगडीत सर्व प्रापर्टी, सेट, इ., हे अव्दैत थिएटर संस्थेची Intellectual property असून निर्माते राहुल भंडारे यांच्या परवानगीशिवाय वापरली असल्यामुळे ही शूटिंग कुठेही रिलीज करू नये अन्यथा Intellectual property rights अंतर्गत श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा अर्ज शिवडी पोलिस स्थानकाला देण्यात आला आहे.

निर्माते राहुल भंडारे यांचा तक्रार अर्ज शिवडी पोलिस स्थानकत स्वीकारला असून पोलिसांमार्फत अभिनेते श्रेयस तळपदे सोबतच सुरेश सावंत यांची चौकशी होणार आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती