Ranveer & Deepika Team Lokshahi
मनोरंजन

Ranveer Deepika : रणवीर-दीपिकाच्या नव्या घराची किंमत माहितीये का?

बॉलिवूडचं सर्वात लोकप्रिय आणि प्रेमळ जोडपं रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukon) लवकरच बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan) यांचे शेजारी बनणार आहेत.

Published by : prashantpawar1

बॉलिवूडचं सर्वात लोकप्रिय आणि प्रेमळ जोडपं रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukon) लवकरच बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan) यांचे शेजारी बनणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार रणवीर सिंग याने नुकतच समुद्रासमोरील अपार्टमेंट घेतलं आहे ज्यासाठी अभिनेत्याने 7.13 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरलं आहे. रणवीरची ही मालमत्ता सागर रेशम अपार्टमेंटमध्ये आहे जी वांद्रे पश्चिम मुंबई येथे आहे. हा परिसर मुंबईतील पॉश परिसरांपैकी एक आहे जिथं शाहरुख खान आणि सलमान खान यांचे देखील बंगले आहेत. आता रणवीर आणि दीपिकाच्या बंगल्याची पहिली झलक समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मोठ्या इमारतीत बांधकाम दिसत आहे.

व्हिडिओमध्ये असा दावा केला जातोय की हे रणवीर-दीपिकाचे घर आहे जे शाहरुखच्या मन्नत या बंगल्या जवळ आहे.

रणवीर-दीपिकाच्या या घराची किंमत तब्बल 119 कोटी रुपये आहे. रणवीर आणि दीपिकाने या क्वाड्रप्लेक्स अपार्टमेंटसाठी करोडो रुपये मोजलेले आहेत. त्यामुळे हे घर किती आलिशान असेल याची देखील कल्पना करावी लागेल. रणवीरचे नवीन घर मुंबईतील महागड्या वांद्रे भागात आहे. रणवीर-दीपिकाचे घर ज्या इमारतीत आहे त्या इमारतीत सी-फेसिंगसह 19 कार पार्किंग स्लॉट आहेत. हे अपार्टमेंट बँडस्टँडवरील सागर रेशम या सुपर प्रीमियम निवासी टॉवरच्या १६व्या, १७व्या, १८व्या आणि १९व्या मजल्यावर आहे. ज्याचे एकूण कार्पेट क्षेत्र ११,२६८ चौरस फूट आहे आणि १,३०० चौरस फूट एक खास टेरेस आहे.

रणवीर सिंगने हे अपार्टमेंट ओह फाइव्ह ओह मीडिया वर्क्स एलएलपी नावाच्या कंपनीद्वारे खरेदी केले आहे. रणवीर आणि त्याचे वडील जगजीत सुंदर सिंग या कंपनीत संचालक आहेत. या करारासाठी कंपनीने 7.13 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे