बॉलिवूडमधील अभिनेते साजिद खान यांच्या निधनाची दु:खद बातमी समोर आली आहे. यानंतर बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक असलेला साजिद खान ट्रेंड होऊ लागला. काही जणांनी तर साजिद खानला श्रद्धांजली देण्यास सुरू केले. हा प्रकार दिग्दर्शक साजिद खानच्या लक्षात येताच स्वतः साजिद थक्क झाला. यावर साजिद खानने स्वत: स्पष्टीकरण दिले आहे.
'मदर इंडिया' फेम अभिनेते साजिद खान यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७०व्या वर्षी जगाला निरोप दिले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेते साजिद खान कर्करोगाने ग्रस्त होते. मात्र उपचारावेळीच त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांच्या निधनाची माहिती ही आता समोर आली आहे.
परंतु, नेटकऱ्यांनी दिग्दर्शक साजिद खानला श्रध्दांजली देण्यास सुरुवात केली आहे. हे प्रकार लक्षात येताच साजिद खानने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले आहे. साजिद खानने एक व्हिडीओ शेअर करत 'मी जीवंत आहे', असे सांगितले आहे.