मनोरंजन

Ram Gopal Varma : “मी गे नाही मात्र…”, ‘या’ अभिनेत्याला राम गोपाल वर्मा यांना करायचं होतं किस

बॉलिवूड म्हटले की अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात. कलाकार, दिग्दर्शक यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी असतात ज्या की आपल्याला माहित नसतात.

Published by : Siddhi Naringrekar

बॉलिवूड (Bollywood) म्हटले की अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात. कलाकार, दिग्दर्शक यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी असतात ज्या की आपल्याला माहित नसतात. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा ( Ram Gopal Varma ) हे त्यांच्या चित्रपटांबरोबर अनेक वादग्रस्त विधानांमुळे देखिल चर्चेत असतात. आतासुद्धा अशाच एका वक्तव्यामुळे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा चर्चेत आले आहेत. राम गोपाल वर्मा यांचा ‘लड़की: एंटर द गर्ल ड्रॅगन’ (Ladki: Enter the Girl Dragon ) हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. प्रमोशनच्या दरम्यान एका मुलाखतीत त्यांनी असे काही वक्तव्य केले आहे की ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांना एका अभिनेत्याला किस करण्याची इच्छा झाली होती असं वक्तव्य त्यांनी केलंय.

राम गोपाल वर्मा ( Ram Gopal Varma ) म्हणाले की, ते ब्रूस लीचे मोठो चाहते असल्याचं सांगितलं. लहान असतानाच त्यांनी ब्रूस ली यांचा ‘एंटर द ड्रॅगन’ हा सिनेमा पाहिला होता आणि तेव्हा पासून ते ब्रूस लीचे फॅन झाले. “ब्रूस ली जिवंत असते तर त्यांना काय प्रश्न विचारला असता? ” असा सवाल मुलाखतीत राम गोपाल वर्मा यांना विचारण्यात आला. यावर राम गोपाल वर्मा ( Ram Gopal Varma ) म्हणाले, “मी गे नाही, मात्र ब्रूस ली एकमेव अशी व्यक्ती आहे जिला किस करण्याची माझी इच्छा होती.”

यासोबतच ते म्हणाले की, “ब्रूस लीमध्ये काही तरी वेगळं होतं. त्यांची गती किंवा त्यांची ताकद नव्हे तर त्याचं व्यक्तिमत्व, स्क्रिनवरील वावर आणि त्यांची नजर यातच सर्वकाही होतं. ब्रूस ली यांना त्यांच्या ताकदीची कल्पना होती. त्यांच्या प्रत्येक पंचवर प्रतिक्रिया देण्यासाठी ते चाहत्यांना वेळ देत.”

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news