मनोरंजन

Dilip Kumar : सायरा बानो नि:शब्द…!

Published by : Lokshahi News

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी आज अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.
दिलीप कुमार यांचे पार्थिव रूग्णालयातून त्यांच्या पाली हिल स्थित घरी नेण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. प्राप्त माहितीनुसार, आज संध्याकाळी 5 वाजता दिलीप कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. अंत्यविधीसाठी केवळ 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

रूग्णवाहिकेतून दिलीप कुमार यांचे पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी पत्नी सायरा बानो (Saira Banu) दिलीप कुमार यांच्या पार्थिवासमोरच्या त्यानीं एकटक पाहताना होत्या.सायरा आणि दिलीपकुमार यांना आयुष्यभर एकमेकांची साथ देणं पसंत केलं. सायरा अगदी शेवटपर्यंत सावलीसारख्या दिलीप कुमार यांच्या सोबत राहिल्या. शेवटपर्यंत त्यांची सेवा केली.

वायू प्रदूषण आणि उष्णतेमुळे ब्रेन स्ट्रोकची प्रकरणे वाढली; जगात अशा लोकांची संख्या पोहोचली 1.19 कोटींवर

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर