मनोरंजन

'शिवरायांचा छावा'चा थरारक टीझर रिलीज; 'हा' अभिनेता झळकणार छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत

सुभेदारच्या यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवरायांचा छावा चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अशातच, या चित्रपटाचा थरराक टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Shivrayancha Chhava Teaser : सुभेदारच्या यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवरायांचा छावा चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार? याची उत्सुकता सर्वांनाच होती. अशातच, या चित्रपटाचा थरराक टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

शिवरायांचा छावा या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. यानंतर आता सोशल मीडियावर शिवरायांचा छावा चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला आहे. अभिनेता भूषण पाटील हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. या टीझरमध्ये सुरुवातीला घनदाट जंगल दिसत असून एक वाघ दिसतो. या वाघासमोर भूषण पाटील उभा दिसतं आहे.

अशातच छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा भूषण हा वाघाची शेपूट धरुन त्याला फरफटत घेऊन जाताना दिसत आहे. या टीझरला दिग्पाल लांजेकर यांनी कोण शत्रू यावरी करील कैसा कावा, वाघालाही फाडतो हा 'शिवरायांचा छावा', असे कॅप्शन दिलं आहे. या चित्रपटाच्या टीझरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज, सुभेदार या दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले आहे. आता त्यांच्या शिवरायांचा छावा या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं आहे. हा चित्रपट 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय दिग्पाल लांजेकर यांचा मुक्ताई चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी