Deepika Padukone Lokshahi
मनोरंजन

वयाच्या 12 व्या वर्षी दीपिका पदुकोणने तिची पहिली कविता लिहिली

दीपिका पदुकोण आणि तिची कविता चर्चेत

Published by : Team Lokshahi

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukon) आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. तर आता तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपले इतर टॅलेंट (Talent) लोकांना दाखवले आहे. ज्याला पाहून सगळेच तिच कौतुक करत आहेत. दीपिकाने वयाच्या १२ व्या वर्षी लिहिलेली एक कविता शेअर केली आहे.

दीपिका पदुकोणने वयाच्या १२व्या वर्षी पहिली कविता लिहिली. त्यावेळी शाळेतील सर्व मुलांना कविता लिहिण्यासाठी दोन शब्द देण्यात आले. इतक्या वर्षांनंतर दीपिकाने तिची कविता सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने लिहिलेली ही कविता चाहत्यांना खूप आवडली आहे आणि ही पोस्ट जबरदस्त शेअर होत आहे.

इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट शेअर करत दीपिका पदुकोणने लिहिले की, कविता लिहिण्याचा माझा पहिला आणि शेवटचा प्रयत्न. तो सातवीचा वर्ग होता आणि मी १२ वर्षांच होते. कवितेचं (Poetry) शीर्षक होतं 'मी आहे'. आम्हाला लिहिण्यासाठी दोन शब्द दिले गेले, जे तुम्ही पाहू शकता आणि मग इतिहास घडला.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) 'पठाण' चित्रपटात दिसणार आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका