MBCCL logo 
मनोरंजन

मराठी सेलिब्रिटींमध्ये रंगणार क्रिकेटची मॅच; 'एमबीसीसीएल'च्या लोगोचे अनावरण

Published by : left

क्रिकेट (Cricket) म्हणजे आपल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय. मग त्यापासून आपले कलाकारही कसे दूर राहणार? अनेक जण क्रिकेटचे शौकीन आहेत. मात्र चित्रीकरणाअभावी, वेळेअभावी त्यांना आपली ही आवड जोपासता येत नाही. हेच कारण लक्षात घेऊन अभिनेता सुशांत शेलार यांनी मराठी बॉक्स सेलिब्रिटी क्रिकेट लीगची (एमबीसीसीएल) (MBCCL) स्थापना केली आहे. 'शेलार मामा फाऊंडेशन' (Shelar mama Foundation) आणि 'प्लॅनेट मराठी' प्रस्तुत एमबीसीसीएलच्या लोगोचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या जबरदस्त लोगोमध्ये महाराष्ट्राची शान दर्शवणाऱ्या पिळदार मिश्या, फेटा, बॅट, बॉल आणि स्टंप दिसत आहेत. मराठीबाणा जपणारा हा लोगो समोर आल्यानंतर आता क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागून राहिली आहे ती एमबीसीसीएलची. त्यामुळे आता एमबीसीसीएलही (MBCCL) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एमबीसीसीएलबद्दल (MBCCL) सुशांत शेलार (Sushant Shelar) म्हणतात, '' प्लॅनेट मराठीसोबत हा उपक्रम राबवताना खूप आनंद होत आहे. प्लॅनेट मराठीने नेहमीच अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे. आता लोगोचे अनावरण झाले असून लवकरच एमबीसीसीएलमध्ये महाराष्ट्रातील आपल्या लाडक्या कलाकारांचा खेळ पाहायला मिळणार आहे. ही एक खरीखुरी क्रिकेटची मॅच असून यात काही संघ असतील. फक्त पुरुषच नाही तर स्त्रियाही या खेळात सहभागी होणार आहेत. लवकरच हे संघ जाहीर होणार असून महाराष्ट्रातील विविध शहरातल्या प्रसिद्ध ठिकाणाचे नाव प्रत्येक संघाला दिले जाणार आहे. यानिमित्ताने खेळ आणि महाराष्ट्रातील वास्तुंना प्रोत्साहन दिले जाणार आहे.''

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' एमबीसीसीएलचा (MBCCL) भाग असणे ही आमच्यासाठीही तितकीच मोठी गोष्ट आहे. एमबीसीसीएलच्या निमित्ताने सगळे कलाकार एकत्र येऊन खेळणार आहेत. प्लॅनेट मराठी अशा वेगवेगळ्या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देते.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...