Kangana Ranaut Lokshahi Team
मनोरंजन

हॉलिवूड चित्रपटाची वेदाशी तुलना; असं काही बोलली कंगना की...

हॉलिवूडच्या चित्रपटांबद्दल बोलताना कंगनाने वेद आणि हनुमानाशी केली तुलना....

Published by : prashantpawar1

बॉलिवूडची(bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत(kangana Ranaut) ही काही ना काही मुद्यावरून नेहमी चर्चित असते. कंगनाला कोणत्याही विषयावर आणि कोणत्याही मुद्यावर बोलायचं झालं तर तिच्याकडे प्रत्येक गोष्टीचे उत्तर असते. तिने मार्व्हल स्टुडिओजच्या (Marvel Studios) सुपरहिट फ्रँचायझी 'अ‍ॅव्हेंजर्स' (avenger)आणि इतर हॉलिवूड चित्रपटांबद्दल असं काही सांगितलं आहे जे कोणालाही आश्चर्यचकित करू शकतं. कंगना म्हणते की हे चित्रपट आणि त्यातील काही पात्रे आपल्या वेदांमधून घेतलेली आहेत. कंगनाने 'थॉर'ची तुलना हनुमानाशी केली, तर 'आयर्न मॅन'ला 'महाभारत'चा कर्ण असे देखील म्हटले आहे. तर 'अ‍ॅव्हेंजर्स' सुपरहिरो हे मार्वल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या अमेरिकन कॉमिक पुस्तकांचा भाग असल्याचे देखील तिने सांगितले आहे.

कंगना सध्या 20 मे रोजी रिलीज होणाऱ्या 'धाकड' या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या चित्रपटात तिने गुप्तहेराची भूमिका साकारलेली आहे. एका मुलाखती दरम्यान कंगनाने तिच्या करिअरपासून ते तिच्या वयक्तिक जीवनाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या.

जेव्हा कंगनाला विचारण्यात आले की जर तुला सुपरहिरोची भूमिका साकारायची असेल तर त्याक्षणी तू हॉलीवूडमधील कॉमिक बुक स्टाईलमध्ये ते करशील की त्यासाठी भारतीय पौराणिक कथांपासून प्रेरणा घेशील? अगदी याला उत्तर देताना कंगना म्हणाली, 'साहजिकच मी सुपरहिरोची भूमिका साकारण्यासाठी माझ्या देशाचा दृष्टिकोन घेईन. मला असे वाटते की हॉलीवूड हे आपल्या भारतीय पौराणिक कथा आणि कादंबऱ्यापासून खूप प्रेरणा घेत असेल. जेव्हा आम्ही त्या सुपरहिरोकडे पाहतो तेव्हा असं वाटतं की ते आपल्या वेदांमधून घेतले असावेत. 'आयर मॅन' च्या चिलखताची तुलना महाभारतातील कर्णाच्या चिलखतासोबत आरामात होऊ शकते . 'थॉर' आणि त्याच्या हातोड्याची तुलना हनुमानजी आणि त्यांच्या गदाशी केली जाऊ शकते असं देखील कंगना म्हणाली.

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी