Admin
मनोरंजन

Bharti Singh : मुलाच्या फोटोशूटमध्ये हुक्का ठेवणे भारती सिंगला पडले महागात; नेटकऱ्यांचा संताप

लोकप्रिय महिला कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) . भारतीने आपल्या कॉमेडी अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. 2017मध्ये भारतीचे (Bharti Singh) हर्ष लिंबाचियासोबत लग्न झाले. लग्नानंतर पाच वर्षांनी एप्रिल महिन्यात भारती सिंहने पहिल्या बाळाला जन्म दिला.

Published by : Siddhi Naringrekar

लोकप्रिय महिला कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) . भारतीने आपल्या कॉमेडी अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. 2017मध्ये भारतीचे (Bharti Singh) हर्ष लिंबाचियासोबत लग्न झाले. लग्नानंतर पाच वर्षांनी एप्रिल महिन्यात भारती सिंहने पहिल्या बाळाला जन्म दिला. भारती सिंहचा (Bharti Singh) मुलगा कसा दिसतो. तिच्या मुलाचा फोटो पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली होती. भारतीने तिच्या मुलासोबतचा पहिला व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. या व्हिडीओत त्यांनी त्यांच्या मुलाचे नावही सांगितले. आता भारती तिच्या मुलाचे फोटोशूट करण्यात बिझी आहे. भारती आणि हर्ष त्यांच्या मुलाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करतात.

नुकताच एक फोटो भारतीने सोशल मिडियावर शेअर केला आहे. मात्र यावेळी नेटकऱ्यांनी या फोटोवर संताप व्यक्त केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये भारती सिंगचा मुलगा लक्ष्य पांढऱ्या कपड्यात खुर्चीवर बसलेला दिसत आहे. पण या चित्राकडे एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या फोटोमध्ये लक्ष्यच्या शेजारी एक हुक्का ठेवलेला दिसत आहे.

लक्ष्यच्या फोटोंना प्रत्येक वेळी चाहत्यांचे प्रेम आणि आपुलकी मिळते, मात्र यावेळी फोटोतील हुक्का पाहून चाहते भारतीवर थोडे रागावलेले दिसले. चित्रात दिसणारा हुक्का पाहून एका यूजरने म्हटले की, 'मुल खूप गोंडस दिसत आहे, पण हुक्का हा आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे, तो अजिबात चांगला नाही.' त्याचवेळी एका यूजरने लिहिले की,'बाकी सर्व ठीक आहे, पण हा हुक्का कोणत्या आनंदात ठेवला आहे भाऊ.' याशिवाय इतरही अनेक जण हा हुक्का पाहून प्रश्न विचारताना दिसले. चित्रात दिसणारा हुक्का बनावट असला तरी चाहत्यांना तो फारसा आवडला नाही. यापूर्वी भारतीने हॅरी पॉटरच्या लूकमध्ये तिच्या मुलाचे फोटोशूट केले होते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले होते. मात्र, यावेळी भारतीची स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरली नाही.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती