गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा काळातील अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटानंतर अजून एक दिग्दर्शक महेश मांजेरकर यांचा आगामी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटात अक्षय कुमारसोबत बिग बॉस फेम जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे आणि विशाल कदम यांचीही चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अभिनेता दिग्दर्शक प्रविण तरडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादा म्हणजेच हार्दिक जोशी देखिल या चित्रपटात काम करणार आहे.
काल २ नोव्हेंबर रोजी वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचा शुभारंभ प्रयोग पार पडला. या कार्यक्रमाला मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थिती होती. हा चित्रपट २०२३मध्ये प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटातील अक्षय कुमारच्या फर्स्ट लूकची झलक यावेळी दाखवण्यात आली. शिवकाळातील एक पराक्रमी पान उलगडण्यासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पाऊल पुढे टाकलं आहे. शिवकाळातील सात वीरांचे महत्त्व सिनेमातून मांडण्यात येणार आहे.