बॉलिवूड इंडस्ट्रीतील क्यूट कपलपैकी एक बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर (karan grover) यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. या जोडप्याने आता फॅमिली प्लॅनिंग (Family planning) केल्याचे सांगितले जात आहे. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर येत्या काही दिवसांत त्यांच्या पहिल्या अपत्याची अपेक्षा करत आहेत.
पिंकविलाशी संबंधित सूत्रानुसार, बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरने फॅमिली प्लॅनिंग केली आहे. येत्या काही दिवसांत ही जोडी त्यांच्या चाहत्यांमध्ये अधिकृत घोषणा करणार आहे. बिपाशा आणि करणने काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाचा 6 वा वाढदिवस साजरा केला होता. दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एकमेकांसाठी क्यूट नोट्सही शेअर केल्या होत्या.
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरने 2016 मध्ये एप्रिल महिन्यात लग्न केले होते. या जोडप्याच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. चाहतेही या गुड न्यूजची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. या जोडप्याच्या तोंडून ही बातमी ऐकण्यासाठी सगळेच हताश झाले आहेत.
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांची 2015 मध्ये अलोन चित्रपटाच्या सेटवर भेट झाली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची जवळीक वाढली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन भूषण पटेल यांनी केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास दाखवू शकला नाही.