Bipasha Basu Birthday Team Loksahi
मनोरंजन

Bipasha Basu Birthday: बिपाशाच्या वाढदिवशी करण सिंग ग्रोवरने केला प्रेमाचा वर्षाव

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री बिपाशा बसू आज तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. बिपाशाने 2001 मध्ये अजनबी या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

Published by : shweta walge

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री बिपाशा बसू आज तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. बिपाशाने 2001 मध्ये अजनबी या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. जर आपण वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललो, तर तिने टीव्ही जगतात आपला ठसा उमटवणारा अभिनेता करण सिंग ग्रोवरशी लग्न केले आहे. बिपाशा आई झाल्यानंतर तिचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. त्याचवेळी अभिनेता करण सिंग ग्रोव्हरने सोशल मीडियावर पोस्ट करत पत्नी बिपाशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता करण सिंग ग्रोव्हरने लिहिले, 'माझी प्रिय, @bipashabasu तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला जावो. तुझी कीर्ती प्रत्येक जाणाऱ्या दिवसाबरोबर वाढू दे. तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत. माझ्यासाठी हा वर्षातील सर्वोत्तम दिवस आहे. मी म्हणू शकेन त्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्या प्रिय बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस.' करण सिंगच्या पोस्टवर बिपाशाने लिहिले की, 'माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आमची मुलगी देवी आहे. माझ्यावर खूप प्रेम केल्याबद्दल धन्यवाद.

बिपाशाचे चाहते देखील अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. करणच्या पोस्टवर चाहते सतत कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'बर्थडेच्या शुभेच्छा सुंदर बिपाशा.

12 नोव्हेंबर 2022 रोजी बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हर आई-वडील झाले. बिपाशाने तिच्यासोबत मुलगी देवीच्या पायाचा आणि करणच्या हाताचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, 'आमच्या प्रेमाचे आणि आईच्या आशीर्वादाचे भौतिक प्रकटीकरण आता येथे आहे आणि ती दैवी आहे.' त्याचवेळी बिपाशाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला आणि तिच्या पतीला नेहमीच मुलगी हवी होती. तिला मुलगी व्हावी म्हणून ती देवाकडे प्रार्थना करायची.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती