मनोरंजन

Bigg Boss OTT 3: अरमान-कृतिकाच्या ‘या’ कृत्यामुळे 'बिग बॉस ओटीटी 3' येणार धोक्यात

अनिल कपूरच्या होस्टींगमुळे ‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सिझन अगदी पहिल्या एपिसोडपासूनच सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Published by : Team Lokshahi

अनिल कपूरच्या होस्टींगमुळे ‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सिझन अगदी पहिल्या एपिसोडपासूनच सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामध्ये असलेल्या स्पर्धकांमध्ये अरमान मलिक आपल्या दोन्ही पत्नींबरोबर या शोमध्ये आला होता, पण त्याची पहिली पत्नी पायल सुरुवातीला घराबाहेर पडली. यानंतर आता अरमान व त्याची दुसरी पत्नी कृतिका या शोमध्ये आहेत. यादरम्यान अरमान आणि कृतिका यांच्या एका कृत्यामुळे हे दोघे आणि बिग बॉस ओटीटी 3 हा कार्यक्रम सध्या वादग्रस्त चर्चेत आला आहे.

‘बिग बॉस ओटीटी’वर 18 जुलैला प्रसारित झालेल्या एका एपिसोडदरम्यान अरमान-कृतिका अश्लिल कृत्य करताना कॅमेरात कैद झाले, याबाबतचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यावर त्या व्हिडीओवरून शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि बिग बॉस ओटीटी 3 हा शो तातडीने बंद करण्याची मागणी केली.

यावर जीओ सिनेमाकडून प्रतिक्रिया आली, जीओ सिनेमावर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या कंटेटची काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला अरमान-कृतिका अश्लिल कृत्य करतानाचा व्हिडीओ बिग बॉस ओटीटी नाही. हा व्हिडीओ चुकीचा आहे तसेच एडिट करून कोणी तरी व्हायरल केल्याचे जीओ सिनेमाकडून सांगण्यात आलं आहे. अशी प्रतिक्रिया जीओ सिनेमाची जरी असली तरी नेटकऱ्यांनी बिग बॉसच्या घरातील असे कृत्य दाखवल्याने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अरमान आणि कृतिकाच्या या कृत्यामुळे अनेक जणं बिग बॉस ओटीटी 3 या कार्यक्रमाच्या विरोधात गेले आहेत आणि कार्यक्रम बंद करण्याची मागणी करत आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी