‘बिग बॉस मराठी’च्या घरासाठी यंदा खास चक्रव्यूह थीम करण्यात आली आहे. घरातील प्रत्येक कोपरा खूप विचारपूर्वक रंगवण्यात आला आहे. घरामध्ये कोझी कॉर्नर आहेत. घरातील प्रत्येक गोष्ट गोलाकार ठेवण्यात आली आहे. यावरून चक्रव्यूह थीम हायलाईट होते. घरातील सदस्यांसाठी‘बिग बॉस’च्या घरात खास अंडर वॉटर बेडरूम बनवण्यात आलं आहे. बेडरूममध्येच कॅप्टनसाठी आलिशान डायमंड रूम बनवण्यात आली आहे. घरात सर्वात जास्त आकर्षित करतं ते म्हणजे चहूबाजूंनी आरश्यांनी सजलेलं त्यातील क्लासी वॉशरुम.
त्यामुळेही तिथेही बिंबप्रतिबिंबाचा खेळ आहे. कलरफुल लिव्हिंग एरियामध्ये रितेश भाऊ दर आठवड्याला स्पर्धकांची शाळा घेताना दिसेल. लिव्हिंग एरियात मुखवट्यांनी डिझाइन करण्यात आलेली ही भिंत जागा लक्षवेधी आहे. त्यामुळे स्पर्धकांचे मुखवटे इथेच उतरवले जातील. ‘बिग बॉस’च्या घरातील किचनमध्ये स्पर्धक जेवण बनवण्याबरोबरच गॉसिपही करताना दिसतील. ‘बिग बॉस’च्या घरात यंदा ‘चाय पे चर्चा’ करण्यासाठी खास कट्टा तयार करण्यात आला आहे.
गार्डन एरियामध्ये हिरवळ आहे. तसेच बाल्कनीदेखील आहे. घरातील प्रत्येक गोष्ट लांबून थ्रीडी वाटत असली तरी जवळ गेल्यावर त्यातील सौंदर्य दिसून येतं. कन्फेशन रूममधील रिफ्लेक्शन्स स्पर्धकांना गोंधळात पाडणारे आहेत. गार्डन एरियामध्ये स्पर्धांना व्यायाम करण्यासाठी जीम आणि स्विमिंग पूल आहे. एकंदरीतच 'बिग बॉस मराठी'चं यंदाचं घर भान उडवणारं, चक्रावणारं आहे. या चक्रव्यूहात कोणते स्पर्धक शिरणार हे जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा.