मनोरंजन

BIGG BOSS मराठीतून ‘ही’ प्रसिद्ध स्पर्धक घराबाहेर, जाणुन घ्या कारण

Published by : Lokshahi News

कलर्स मराठीवर सुरू असलेला बहुचर्चित वादग्रस्त कार्यक्रम बिग बॉस मराठीची चर्चा रंगली आहे. कार्यक्रमाच्या या पर्वातील सदस्यांनादेखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. बिग बॉस हा कार्यक्रम आणि अनिश्चितता यांच खूप जवळच नाते आहे. या खेळात कधी काय घडेल ? हे कोणच सांगू शकत नाही. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये दोन सदस्यांची नावे गाजली. ती म्हणजे कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील. अत्यंत वेगळ्या क्षेत्रातून आलेल्या या दोन्ही महिलांनी पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नुकतेच बिग बॉसच्या घरामध्ये पार पाडलेल्या नॉमिनेशन कार्यात घरातील सदस्यांनी एकूण सात सदस्यांना घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केले होते. घरातील अपुरे योगदान, घरातील वावर, टास्कमधील कामगिरी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीची अकार्यक्षमता या निकषांवर त्यांना नॉमिनेट केले होते. यामध्ये शिवलीलाचाही समावेश होता. पण, काल शिवलीला यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. आणि त्यांना काही काळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचारांकरिता बिग बॉसच्या घराबाहेर जावे लागले. त्यामुळे आजपासून त्‍यांच्‍यासाठीच्‍या व्होटिंग लाईन्स बंद राहतील.

नुकतच शिवलीला यांनी कार्यक्रमामध्ये सांगितले "इथला प्रत्येक माणूस माझा असेल". त्यांच्या या वाक्याने सदस्यांबरोबरचं प्रेक्षकांची मने देखील जिंकली. पण, शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली. आणि आज बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावे लागले. त्यामुळे आजपासून व्होटिंग लाईन्स बंद राहतील.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Ajit Pawar : रोहित पवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा म्हणाले...

अजित पवार यांच्या पाया पडल्यानंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Latest Marathi News Updates live: नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड