मनोरंजन

Bigg Boss Marathi5: मराठी माणसाचा अपमान निक्कीला पडला भारी! भाऊच्या धक्क्यावर मागावी लागणार माफी

बिग बॉस मराठी 5 सुरु होताच चर्चेत येताना दिसला. बिग बॉस मराठी 5 मधील स्पर्धक आणि त्यांच्यातील वाद हे बिग बॉस मराठी 5 ला चर्चेत आणू लागले.

Published by : Team Lokshahi

बिग बॉस मराठी 5 सुरु होताच चर्चेत येताना दिसला. बिग बॉस मराठी 5 मधील स्पर्धक आणि त्यांच्यातील वाद हे बिग बॉस मराठी 5 ला चर्चेत आणू लागले. यावेळेस बिग बॉसच्या सिजनमध्ये पहिल्या आठवड्यातचं भांड्याला भांड लागताना पाहायला मिळालं. यादरम्यान सर्वात गाजलेलं भांडण हे निक्की निक्की तांबोळी आणि मराठी स्टार वर्षा उसगांवकर या दोघींचे होते. यादरम्यान या दोघींचे भांडण सोशल मीडिवर धुमाकूळ घालू लागले. भांडणात निक्की मात्र सोशल मीडिया यूजर्सद्वारे ट्रोल होताना दिसली. अनेक जण असं देखील म्हणाले निक्कीचा मुद्दा जरी योग्य असला तरी तिला मोठ्यांसोबत बोलण्याची पद्धत नाही आहे. याचे कारण असे होते की, या दोघींच्या भांडणात निक्कीने वर्षा उसंगावकर यांची पार अक्कल काढली होती. तिच्या या कृत्यामुळे बिग बॉसचा प्रेक्षकवर्ग देखील निक्कीवर नाराज झालेला पाहायला मिळाला.

तर दुसरीकडे निक्कीच्या अशा बोलण्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखचा ही पारा चढलेला पाहायला मिळत आहे. रितेश देशमुखने निक्कीच्या उद्धटपणाची शाळा भाऊच्या धक्क्यावर घेतली. मी बोलत असताना मध्ये बोलायच नाही असं म्हणतं रितेश देशमुखने मराठी माणसाची बाजू घेतली तर या व्यतिरिक्त रितेश देशमुख निक्कीला म्हणाला, "निक्की तु ज्या भाषेत बिग बॉसच्या घरात मराठी माणसासोबत उद्धटपणाने बोलतेस ते इथे खपवून घेतलं जाणार नाही. माझ्या मराठी माणसाची माफी तुम्हाला मागावी लागेल". त्याच सोबत रितेश देशमुखने म्हटलं "ज्याला बोलायचं भान नाही..त्याला इथे स्थान नाही". असं म्हणतं रितेश देशमुखने निक्कीच्या उद्धटपणावर आपली प्रतिक्रिया दिली.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : राज ठाकरेंना धक्का; अमित ठाकरेंचा पराभव, महेश सावंत यांचा विजय

जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर विजयी

Sanjay Upadhyay Wins: बोरिवलीमधून संजय उपाध्याय विजयी

Bachhu Kadu: अचलपूरमधून बच्चू कडू यांचा पराभव

शरद पवार गटाला अजित पवारांचा दे धक्का; सचिन पाटील विजयी