Abdu Rozik 
मनोरंजन

Bigg Boss 16: कोण आहे अब्दु रोझीक? गरिबीत काढले दिवस,आज घालतो सोन्याचे बूट

बिग बॉस 16ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. या सिझनमधील अब्दु रोझीक सध्या खुप चर्चेत आहे.

Published by : shweta walge

बिग बॉस 16ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. या सिझनमधील अब्दु रोझीक सध्या खुप चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात 19 वर्षीय अब्दु रोझीकचा क्यूटनेस चाहत्यानां खूप पसंतीस येत आहे. चला जाणून घेऊया कोण आहे 3 फूट 3 इंच उंच गायक अब्दू? आणि बिग बॉस 16 मध्ये त्याची एन्ट्री कशी झाली.

कोण आहे अब्दु रझीक?

अब्दु रोझीक हे ताजिकिस्तानमधील लोकप्रिय गायक आहेत. अब्दूचा जन्म 3 सप्टेंबर 2003 रोजी ताजिकिस्तानच्या पंजाकेंट जिल्ह्यात झाला. जगातील सर्वात तरुण गायक असल्यामुळे तो सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो. गायकासोबतच तो एक प्रसिद्ध ब्लॉगर देखील आहे. अब्दुचे Avalon Media नावाचे लोकप्रिय YouTube चॅनल आहे.

या आजारामुळे उंची वाढली नाही

अब्दूला लहानपणी रिकेट्स नावाचा आजार झाला होता. या आजारात मुलांच्या हाडांची वाढ थांबते, यामध्ये हाडे दुखणे, खराब वाढ आणि कमकुवत हाडे यांसारख्या समस्या दिसून येतात. हा आजार व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे होतो.


वयाच्या 6 व्या वर्षी करिअरला सुरुवात झाली

अब्दुने वयाच्या 6 व्या वर्षी गायक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. जनुकीय विकारामुळे त्याची उंची वाढलेली नाही. आणि त्याला हा आजार वयाच्या ८ व्या वर्षी कळला. अब्दुचा पुढचा प्रवास अडचणींनी भरलेला होता. तो कुठेही गेला तरी प्रत्येकजण त्याला बघायचे, पण त्याने हार मानली नाही आणि आपल्या करिअरला योग्य दिशा दिली आणि आज तो एक लोकप्रिय गायक आहे.

एवढ्या संपत्तीचा मालक

अब्दू हे लोकप्रिय गायक आहेत. आज त्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे, पण त्यांचे बालपण गरिबीत गेले. लहानपणी गरिबीमुळे त्यांला उपचार मिळू शकले नाहीत. आम्ही तुम्हाला सांगतो की अब्दूकडे अनेक आलिशान कार आहेत. त्याच्याकडे असलेली सर्वात महागडी कार म्हणजे रोल्स रॉयल घोस्ट. या कारची किंमत सुमारे 6.95 कोटी रुपये आहे. त्याच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेज सी क्लास सारख्या कारचा समावेश आहे. लक्झरी कारशिवाय त्याच्याकडे सोन्याचे शूजही आहेत.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव