मनोरंजन

बिग बी साकारणार अश्वत्थामाची भूमिका; Kalki 2898 AD चा दमदार टीझर प्रदर्शित

या चित्रपटात 'बिग बी यांची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचं म्हटलं जात आहे. 'कल्की 2898 एडी' चा नवीन प्रोमो आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्या आयपीएल सामन्यादरम्यान शेअर करण्यात आला.

Published by : Dhanshree Shintre

नाग अश्विनच्या 'कल्की 2898 एडी' मधील दिग्गज बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या दमदार व्यक्तिरेखेबद्दल गेल्या काही महिन्यांपासून बरीच चर्चा होती. या चित्रपटात 'बिग बी यांची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचं म्हटलं जात आहे. 'कल्की 2898 एडी' चा नवीन प्रोमो आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्या आयपीएल सामन्यादरम्यान शेअर करण्यात आला. 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या टीझरमधून अमिताभ बच्चन या आगामी चित्रपटात अश्वत्थामाची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं आहे. टीझर प्रोमोच्या सुरुवातीला एक लहान मुलगा बिग बींना विचारतो की, ते कधीच मरणार नाहीत हे खरे आहे काय ? नंतर यावर अमिताभ म्हणतो, 'द्वापर युगापासून दशावताराची वाट पाहत आहे. द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा.'

आपल्या इन्स्टाग्रामवर अकांऊटवरुन लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपला कल्की 2898 AD या चित्रपटातील फर्स्ट लूक पोस्ट केला आहे. यावेळी चाहत्यांनी त्यांच्या या लूकचे भरभरून कौतूक केले आहे. कल्की 2898 AD हा चित्रपट यावर्षीचा सगळ्यात मोठा आणि बहुचर्चित चित्रपट आहे. एकापाठोपाठ एक स्टार कास्टचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या समोर येतो आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या या लूकबद्दल खास भावनाही व्यक्त केल्या आहेत.

600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'कल्की 2898 एडी' हा आतापर्यंतचा सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. 'कल्की 2898 एडी' च्या टीझर प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हटक्या अंदाजात दिसत आहे. व्हिडिओ अमिताभ यांचा संपूर्ण चेहरा कापडानं झाकलेला दिसत आहे. यानंतर तोंडावरचा चिखल आणि त्याच्या डोळ्यातील चमक दाखवली गेली आहे. आता अमिताभ यांचा हा लूक सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज महानिकाल; जनतेचा कौल कोणाला मिळणार?

बीड: मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभाग सज्ज- निवडणूक निर्णय अधिकारी पाठक

Beed Vidhan Sabha Election Result 2024; कोणत्या मतदार संघात कोणाची प्रतिष्ठा?

महायुती की महाविकास आघाडी? सकाळी 8 वाजल्यापासून होणार मतमोजणीला सुरुवात

Maharashtra Vidhan Sabha Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज महानिकाल; कोण उधळणार विजयाचा गुलाल?