Amitabh Bachhan  Team Lokshahi
मनोरंजन

'बिग बीं'च्या फिटनेसच रहस्य आलं समोर ?

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा ८० वा वाढदिवस साजरा झाला. ऐशीं वय होऊन ही बच्चनजी हे फिट आणि फाईन आहेत.

Published by : Lokshahi News

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा ८० वा वाढदिवस साजरा झाला. ऐशीं वय होऊन ही बच्चनजी हे फिट आणि फाईन आहेत. अनेक चित्रपट करूनही आजही हे ते त्यांच्या चित्रपटात तेवढ्या एनर्जीने काम करताना दिसतात. त्यांच्या उत्साहामध्ये कोणतीच कमी जाणवत नाही. ऐंशीच्या घरात वय असून ही त्यांची फिटनेस आणि बदलत्या काळाप्रमाणे असलेला त्यांचा फॅशनसेंस याच्यावर आजही आताचा तरुण वर्ग फिदा आहे.

निरोगी आणि फ्रेश राहण्यासाठी अमिताभ बच्चन आजही डाएट फॉलो करतात. पण याच फिटनेस साठी त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. त्यांचे आवडते पदार्थ त्यांना सोडावे लागले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या फिटनेस च हे सिक्रेट समोर आलंय त्यांच्याच कोन बनेगा कोरोडपती या शो मधून. शो दरम्यान ते स्पर्धकाला बोलत करतात आणि याच दरम्यान बोलता बोलता बिग बी देखील त्यांच्या आयुष्यातील अनेक मजेशीर गोष्टी शेअर करत असतात. याच शो मध्ये हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकाशी बोलताना बिग बीनी त्यांच्या डाएट विषयी सांगितलं.

केबीसीमध्ये बिग बिनी स्पर्धकाला त्याचा आवडता पदार्थ कोणता असं विचारलं असता स्पर्धकानं म्हटलं, 'जया जींना फिश आवडतात ना सर'. त्यावर बिग बी म्हणाले, 'हो तिला फिश खूप आवडतात'. यावर स्पर्धकानं, 'सर तुम्हालाही फिश आवडतात का?', असं विचारलं. त्यावर बिग बी म्हणाले, 'मी फिश खाणं सोडलं.

मी खूप गोष्टी सोडल्या. मी आता मांस खाणं सोडलं आहे. काही दिवसांपासून मी गोड खाणंही सोडलंय. भातही खाणं सोडलं.

खेळात पुढे हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धक विद्या यांनी बिग बींना म्हटलं, 'लोक इथे पैसे कमावण्यासाठी येतात पण मी इथे तुम्हाला भेटायला आली आहे'. यावर बिग बी म्हणाले, 'तुम्हाला मला भेटायचंच होतं तर आपण दुसरीकडे कुठेतरी भेटलो असतो'. बिग बींच्या प्रश्नावर विद्या म्हणाल्या, 'माझी 22 वर्षांची तपस्या आज पूर्ण झाली'.

Mumbai Vidhansabha Poll | मुंबईकरांचा कौल कोणाला? 'या' नेत्यांना मिळणार पराभवाचा धक्का ?

मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय

'त्या' प्रकरणी अजित पवार यांना बारामती कोर्टाचे समन्स

महाराष्ट्रातील 36 जिल्हे, 288 मतदारसंघ, जवळपास 4500 मतमोजणी पथके मतमोजणीसाठी सज्ज

Jalgaon | Gulabrao Patil यांच्या विजयासाठी साकडं; पशुपतीनाथ महादेव मंदिरात अभिषेक