Ravi kale & Bhargavi Chirmule 
मनोरंजन

भार्गवीचा नवा चित्रपट 'गुल्हर' प्रदर्शनासाठी सज्ज ;'या' तारखेला होणार प्रदर्शित

शीर्षकापासूनच प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करणाऱ्या 'गुल्हर' या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं नावीन्यपूर्ण आणि सशक्त कथानक पहायला मिळणार आहे.

Published by : Rajshree Shilare

मराठी चित्रपट सृष्टीत ग्रामीण चित्रपटाचे महत्व अनन्यसाधारण आहे. ग्रामीण चित्रपटातूनच मराठी चित्रपट समृद्ध होत गेला. सध्या अशाच एका ग्रामीण चित्रपटाची चर्चा आहे. ग्रामीण जीवनातील संघर्ष दाखवणारा हा चित्रपट प्रेम, नातेसंबंध, ग्रामीण जीवन अशा विविध पैलूंवर भाष्य करतो.

'गुल्हर' (Gulhar)असे या चित्रपटाचे नाव आहे. 6 मे 2022 ही प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली. ‘गुल्हर’ मध्ये प्रेक्षकांना रवी काळे (Ravi Kale) आणि भार्गवी चिरमुले (Bhargavi Chirmule) या दोन आघाडीच्या कलाकारांच्या रूपात एक नवीन जोडी पहायला मिळणार आहे.

‘गुल्हर’ (gulhar) या चित्रपटाच्या निमित्ताने काही वेगळे प्रयोग करण्यात आल्याचे संकेत निर्माते शांताराम मेदगे(Shantaram Medage) , शिवाजी भिंताडे(Shivaji Bhintade) , अनुप शिंदे(Anup Shinde) , अबिद सय्यद (Abid Syed)यांनी दिले आहेत. या चित्रपटातील रवी काळे आणि भार्गवी चिरमुले ही जोडी हे मुख्य आकर्षण ठरणार असल्याचा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटात रवी यांनी "गिरीजू" ही व्यक्तिरेखा साकारली असून, त्यांच्या जोडीला "राधेच्या" भूमिकेत भार्गवी आहे.

Gulhar

नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये प्रगतीपासून लाखो कोस दूर असलेल्या, तसंच प्रतिकूल परिस्थितीतही सुखी वाटणाऱ्या कटुंबाचं चित्र पहायला मिळतं. या चित्रपटाची कथा एका ११ वर्षाच्या मुलाभोवती गुंफण्यात आली आहे. यात विनायक पोद्दार, माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, शिवानी बावकर, गणेश कोकाटे, कपिल कदम, पुष्पा चौधरी, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत, स्वप्निल लांडगे, रेश्मा फडतरे, सचिन माळवदे, देवेंद्र वायाळ, गणेश शितोळे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. मोहन पडवळ यांनी या चित्रपटाची कथा लिहीली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचे तर नृत्य दिग्दर्शन विशाल पाटील यांचे आहे.

Atul Benke Junnar Assembly constituency: जुन्नर मतदारसंघात अतुल बेनके यांची तिसरी लढत

Harshwardhan Patil Indapur Assembly constituency: इंदापूर विधानसभेत हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यात तीव्र संघर्ष

Aawaj Lokshahicha |उद्योगाचं माहेरघर बल्लारपूरमध्ये कोण मारणार बाजी? मुनगंटीवार पुन्हा मैदान मारणार?

Yugendra Pawar Baramati Assembly constituency: बारामतीत काका पुतण्यामध्ये चुरस, कोण मारणार बाजी

Latest Marathi News Updates live: वांद्रे कुर्ला संकुल(BKC) मेट्रो स्टेशनच्या बाहेर आग