मनोरंजन

Shah Rukh Khan Banda Song: किंग खानच्या 'डंकी'तील 'बंदा' गाणं आऊट

बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री तापसी पन्नू स्टार 'डंकी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Published by : Team Lokshahi

Dunki New Song: बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री तापसी पन्नू स्टार 'डंकी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील 'बंदा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'बंदा' या गाण्याआधी 'लुटपुट गया', 'निकले थे कभी हम घरसे' आणि 'ओ माही' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. आता या गाण्यातील चौथ्या गाण्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

शाहरुख खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट करत या चित्रपटातील चौथं गाणं शेअर केले आहे. सध्या सोशल मीडियावर या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. शाहरुख खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'डंकी' ड्रॉप 6 शेअर केला आहे. त्याने 'बंदा' गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या गाण्याचे संगीत प्रीतम यांनी दिले असून कुमार यांचे बोल आहेत. हे गाणं पंजाबी गायक दिलजीत दोसांझने गायलं आहे.

त्याने गाण्याचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुम जो मांग लोगे दिल तो ये जान देगा बंदा...वादों का इरादा का और अपने यारों का यार... दलजीत दोसांझ पाझीने 'बंदा' हे गाणं खूपच चांगलं गायलं आहे. त्याच्यामुळे या गाण्याला जीवदान मिळाले. थँक्यू अॅन्ड लव्ह यू पाझी...' शाहरुखच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. 'डंकी' या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. तसेच तापसी पन्नू, बोमान इरानी, सतीश शाह, दिया मिर्जा, विक्रम कोचर आणि विकी कौशल हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'डंकी' या सिनेमात शाहरुख खान आणि तापसी पन्नूची जोडी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शाहरुखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी यांच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी