मनोरंजन

Ayesha Takia: आयशा टाकियाने केलं इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट? जाणून घ्या यामगचं नेमक कारण...

आयशा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असली तरी तिच्या बाबतीत चर्चा फार कमी प्रमाणात ऐकायला मिळाल्या आहेत. मात्र नुकतीच तिच्या संबंधित एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे तिने आपलं इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केलं आहे.

Published by : Team Lokshahi

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आयशा टाकिया हीने चित्रपटसृष्टीत २००४ साली पदार्पण केलं. तिचा पहिला चित्रपट हा "टार्जन द वंडर कार" हा असून या चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. यानंतर ती अनेक बॉलिवूड चित्रपटातून दिसून आली. आयशाने टार्जन द वंडर कारनंतर डोर, नो स्मोकिंग, वाँटेड यांसारख्या चित्रपटात काम करून आपला चाहतावर्ग मोठा केला आहे. आयशा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असली तरी तिच्या बाबतीत चर्चा फार कमी प्रमाणात ऐकायला मिळाल्या आहेत. मात्र नुकतीच तिच्या संबंधित एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे तिने आपलं इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केलं आहे.

आयशाने तिची एक व्हिडियो सोशल मीडियावर शेअर केली होती. ज्यामध्ये तिचा प्लास्टिक सर्जरी केलेला लूक दिसत आहे या लूकमुळे ती चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसली. या हा व्हिडियो गाडीतला आहे ज्यामध्ये तिने पारंपारिक लूक केला आहे. तिने निळ्या रंगाची सिल्क साडी नेसली होती आणि त्यावर गोल्डन नेकलेस घातला होता. यावर चाहत्यांकडून मात्र टीका करण्यात आल्या यात चाहते म्हणाले, हे असं काही करायची गरज होती का?, अत्यंत वाईट दिसतेस, हे काय करू ठेवलंय? अशा प्रकारे नेटकरी व्यक्त होऊ लागले. यासर्व टीकांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला पण तिला ट्रोलर्स ट्रोल करायचं थाबवत नव्हते अखेर तिने इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला अशी बातमी समोर आली आहे. दरम्यान तिच्या अकाउंटचं नाव आयशा टाकिया आझमी असं होत तर तिचे 3 मिलियनहून अधिक फॉलोअर्स होते.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result