Brahmastra Team Lokshahi
मनोरंजन

Brahmastra : अयानने गुरुपौर्णिमेच्या मुहुर्तावर ब्रह्मास्त्राच्या मूळ संकल्पनेचे रहस्य केले उघड

या व्हिडिओमधून अयान मुखर्जी प्रेक्षकांना शस्त्रांमागील संकल्पना आणि भारतीय पौराणिक कथांमधील विश्वाचा पाया समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Published by : shamal ghanekar

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) या जोडीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. 'ब्रह्मास्त्र' (Brahmāstra) चित्रपटाच्या निर्मात्यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर ब्रह्मास्त्रच्या संकल्पना आणि परिसरावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. निर्मात्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या आगामी चित्रपटाची संकल्पना प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे.

या व्हिडिओमधून अयान मुखर्जी प्रेक्षकांना शस्त्रांमागील संकल्पना आणि भारतीय पौराणिक कथांमधील विश्वाचा पाया समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या अस्त्रामध्ये पृथ्वी, वायू, अग्नी, पाणी यासारख्या निसर्गात आढळणाऱ्या अनेक शक्ती आणि प्राण्यांच्या शक्तींचा समावेश होतो.

रणबीर कपूर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असणार असून तो आधुनिक काळातील नायक ही भुमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो शस्त्रांच्या जगात तोच एक शस्त्र आहे. भगवान शिव यांच्या नावावरून नाव देण्यात आले आहे.

हा व्हिडिओ अयान मुखर्जी, आलिया भट्टने सोशल मीडियावरही शेअर केला आहे. 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 प्रदर्शित होणार आहे असून हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भुमिकेत अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय आणि नागार्जुन अक्किनेनी दिसणार आहेत.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय