मनोरंजन

अरबाज-जॉर्जियाचे ब्रेकअप? जॉर्जियाची 'ही' विधाने चर्चेत

अरबाज माझा खूप चांगला मित्र आहे. पण आमच्या लग्नाचा कोणताही प्लॅन नाही. असं जॉर्जिया म्हणाली आहे. बॉलीवूड हंगामाला तिने मुलाखत दिली त्यात तिने हि विधाने केली आहेत.

Published by : Team Lokshahi

बॉलिवूड अभिनेता, चित्रपट निर्माता अरबाज खान याची लव्ह लाईफ त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त चर्चेत असते. अरबाज खान त्याची पहिली पत्नी मलायका अरोरासोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत होता. मलायकासोबतचे लग्न तुटल्यानंतर अरबाजच्या आयुष्यात अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीची एंट्री झाली. परंतु, आता अरबाजचे आणि जॉर्जियाचेही ब्रेकअप झाले आहे का? याबद्दल स्वतः जॉर्जियानेच एक विधान केलं आहे. जॉर्जियाने अरबाजला बॉयफ्रेंड नव्हे तर एक चांगला मित्र समजत असल्याचंही म्हटलं आहे.

त्यांच्या वयात मोठे अंतर आहे

जॉर्जियाच्या म्हणते अरबाज आणि ती चांगले मित्र आहेत, परंतु कदाचित त्यांचे प्रेम प्रकरण संपले आहे. बरं, फक्त अरबाज आणि जॉर्जियाच् त्यांच्या नात्याच्या समाप्तीचे सत्य अधिक चांगल्या प्रकारे प्रकट करू शकतात. दोघांच्या वयात सुमारे 20 वर्षांचा फरक आहे. अरबाज खान आणि जॉर्जियाला एकत्र डेट करून 4 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अरबाज खान आणि जॉर्जिया अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. मात्र, बऱ्याच दिवसांपासून दोघेही क्वचितच एकत्र दिसायला लागले आहेत.

जॉर्जियाच्या म्हणण्यानुसार, तिचा आणि अरबाज खानचा लग्नाचा कोणताही विचार नाही. लॉकडाऊननंतर दोघांमधील संबंध खूप बदलले आहेत.मी मलायका आणि अरबाजच्या कुटुंबाला अनेकदा भेटले आहे. अरबाज माझा खूप चांगला मित्र आहे. पण आमच्या लग्नाचा कोणताही प्लॅन नाही. असं जॉर्जिया म्हणाली आहे. बॉलीवूड हंगामाला तिने मुलाखत दिली त्यात तिने हि विधाने केली आहेत.

जॉर्जिया एंड्रियाची ओळख

जॉर्जिया हि एक अभिनेत्री, मॉडेल आहे. ती मूळची इटली येथील आहे. 2019 मध्ये जॉर्जियाने कॅरोलिन कामाक्षी या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. जॉर्जियाने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे. जॉर्जिया तिच्या ग्लॅमरस इमेजसाठीही प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवर जॉर्जियाचे जबरदस्त फोटो रोज दिसत असतात.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...