केंद्र सरकारकडून 'पद्म' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. व्यंकय्या नायडू, वैजयंतीमाला, चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आले. उदय देशपांडे, मनोहर डोळे, चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले. कल्पना मोरपारिया, शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले. 5 जणांचा पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आले. एकूण 132 जणांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण 132 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडेंना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. एकूण 5 जणांचा पद्मविभूषण तर 17 जणांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर 110 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला बाली, अभिनेते चिरंजीवी, बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) आणि पद्मा सुब्रह्मण्यम यांना 'पद्मविभूषण'ने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त, होर्मूसजी कामा, आश्विन मेहता, माजी राज्यपाल राम नाईक, संगीतकार प्यारेलाल आणि कुंदन व्यास यांना 'पद्मभूषण'ने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, राधा कृष्ण धिमन, मनोहर डोळे, झहीर काझी, चंद्रशेखर मेश्राम, कल्पना मोरपरिया, सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांचा 'पद्मश्री'ने सन्मान करण्यात येणार आहे.
हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी मार्च/एप्रिलच्या सुमारास राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात प्रदान केले जातात. वर्ष 2024 साठी, राष्ट्रपतींनी खालील यादीनुसार 2 विभागून पुस्कारांसह (एक पुरस्कार गणला जातो) 132 पद्म पुरस्कार प्रदान करायला मान्यता दिली आहे. या यादीत 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 30 महिला आहेत आणि या यादीत परदेशी/NRI/PIO/OCI या श्रेणीतील 8 व्यक्ती आणि 9 मरणोत्तर पुरस्कारप्राप्त व्यक्तींचाही समावेश आहे.