Ankita Lokhande and Vicky Jain Team Lokshahi
मनोरंजन

Ankita Lokhande and Vicky Jain : अंकिता लवकरच होणार आई?

अंकिता आणि विकी यांच्या लग्नाला ६ महिने पूर्ण झाले आहेत.

Published by : shamal ghanekar

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये विकी जैनसोबत (Vicky Jain) विवाहबंधनात अडकली. अंकिता आणि विकी यांच्या लग्नाला ६ महिने पूर्ण झाले आहेत. यानिमित्त दोघांनी कुटुंबियांबरोबर धम्माल सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंना अंकिताने एक कॅप्शन दिले होत.

या कॅप्शनमध्ये (Caption) अंकिताने लिहिले की, “सहा महिन्याच्या शुभेच्छा बाळा. तुला खूप खूप प्रेम. हे खास बनवल्याबद्दल कुटुंबाचे आभार. माझ्या प्रिय वहिनीचे विशेष आभार. आमचा आजचा हा दिवस इतका खास बनवला. खूप खूप प्रेम”, असे अंकिता लोखंडेने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

अंकिताने हे कॅप्शन देताना शेवटला बाळाचा एक इमोजी शेअर केला असल्याने ती गरोदर असल्याचे म्हटले जात आहे. या सेलिब्रेशनच्या फोटोंवरून आता अंकिता लवकरच ती आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पण अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नसून यावर दोघांनीही काहीही स्पष्टीकरण अजूनही दिलेले नाही.

Latest Marathi News Updates live: सरकार स्थापनेबाबत दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आज चर्चा होणार

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; विविध विधेयकांवर होणार निर्णय

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर; मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड