मनोरंजन

राधिका मर्चंटच्या लग्नसमारंभादरम्यान होतेय अंजली मर्चंटची चर्चा, अंजली मर्चंट आहे तरी कोण?

अंनत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसमारंभाची चर्चा जगभर चालू होती. यादरम्यान अंजली मर्चंट या नावाची चर्ची सध्या सुरु आहे.

Published by : Team Lokshahi

अंनत अंबानी आणि राधिका मर्चंटची लग्नगाठ 12 जुलैला बांधली गेली. या जोडप्याच्या लग्नाआधीच्या समारंभासोबतच लग्नाच्या प्रत्येक सोहळ्याला अनेक दिग्गजांनी आपली हजेरी लावली होती. अंनत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या हळदी समारंभात देखील क्रिकेटर्ससोबत अनेक बॉलीवूड आणि इतर देशीतील सेलिब्रिटींनी आपली उपस्थिती दाखवली होती. अंनत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसमारंभाची चर्चा जगभर चालू होती. यादरम्यान अंजली मर्चंट या नावाची चर्ची सध्या सुरु आहे.

राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्यादरम्यान राधिकासोबत अंजली मर्चंटचे काही फोटो पाहायला मिळाले. यादरम्यान अंजली मर्चंट विषयी चर्चांना सुरुवात झाली. अंजली मर्चंट ही राधिका मर्चंटची मोठी बहिण आहे. अंजली मर्चंट ही राधिकापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे. अंजली मर्चंटने 2006 पासून जाहिरात फर्म पब्लिसमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. 2018 साली अंजली मर्चंट 'ड्रायफिक्स' या हेअरस्टाइलिंग कंपनीची सहसंस्थापक झाली. यादरम्यान तिने अनेक बॉलीवूडमधील कलाकारांच्या हेअरस्टाइलिंगचे काम केले. अंजली मर्चंटचा विवाह 2020 साली अमन मजिठिया यांच्यासोबत झाला. यांचे लग्न गोव्यात पार पडले आणि त्यात देखील अनेक व्यावसायिक, राजकीय आणि सेलिब्रिटींनी आपली हजेरी लावली होती.

राधिकाच्या मेहेंदी फंक्शनपासून ते तिच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनमध्ये अंजली मर्चंट राधिकासोबत एकत्र पोज देताना दिसून आली आहे. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये अंजली मर्चंट हिरव्या लेहेंग्यात दिसली आणि तेव्हापासून ती अनेकदा कॅमेरासमोर दिसून आली तर राधिकाच्या लग्नाच्या दिवशी राधिकाने केलेल्या वधूच्या लूकमुळे अंजली मर्चंट हे नाव अधिक चर्चेत आलं. अंजली मर्चंटने स्वतःच्या लग्नात जे आभूषण केले होते, त्याच प्रकारचे आभूषण राधिकाने देखील स्वत:च्या लग्नातील वधूच्या लूकसाठी केले होते. यामुळे अंजली मर्चंटचा तिच्या लग्नातील वधूचा हा फोटो सध्या पाहायला मिळत आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी