मनोरंजन

Anil Kapoor: 'छावा' चित्रपटात अनिल कपूर साकारणार औरंगजेबची भूमिका

'छावा' या सिनेमात अनिल कपूर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Published by : Team Lokshahi

अनिल कपूर यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. सध्या त्याचा 'एनिमल' या चित्रपटातील लुक हा फारच आकर्षक आहे. रणबीर कपूरच्या वडिलांची या चित्रपटातून भुमिका करणार आहेत. अनिल कपूर यांचा रूबाब आजही तसाच आहे अगदी 80 तल्या चॉकलेट हिरोसारखा. अद्यापही ते तितकेच चिकणे आणि हॅण्डसम दिसतात.

'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सध्या त्यांच्या आगामी 'छावा' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. विकी कौशल आणि 'रश्मिका मंदाना' या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता या सिनेमासाठी अनिल कपूर यांना विचारणा झाली असून ते औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे.

'छावा' या सिनेमातील औरंगजेबाच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी अनिल कपूर यांना विचारणा झाली असल्याचं समोर आलं आहे. 'छावा' या सिनेमाच्या टीमने याआधीही अनिल कपूर यांना विचारणा केली आहे. त्यामुळे अनिल कपूर आता विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसतील.

'छावा' हा पीरिअड ड्रामा असणार आहे. या सिनेमात विकी कौशल संभाजी महाराजांच्या तर रश्मिका त्यांच्या पत्नीच्या अर्थात येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे. मराठ्यांचा गौरव आणि संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवर आधारित हा सिनेमा असणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विकी कौशल आणि रश्मिका पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

'छावा' या सिनेमाच्या शूटिंगला ऑक्टोबर महिन्यात सुरुवात होणार आहे. 2024 पर्यंत या सिनेमाचं शूटिंग पूर्ण करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. मुंबई, वाई, भोर, जयपूर आणि महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. 'छावा' या सिनेमासाठी विकी कौशलने 10 ते 12 किलो वजन कमी केलं आहे. 14 ऑक्टोबरपासून पुढचे 100 ते 150 दिवस 'छावा' सिनेमाचं शूटिंग सुरू राहणार आहे. 'छावा' या सिनेमासह विकीला 'बब्बर छेर' या सिनेमासाठीही विचारणा झाली आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news