Anil Kapoor & Salman Khan Lokshahi Team
मनोरंजन

Anil kapoor : सलमान- अनिलचा जुग जुग जिओनंतर नवा चित्रपट

राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर भीम सिंगच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात तो पती आणि वडिलांच्या भूमिकेत आहे.

Published by : prashantpawar1

अनिल कपूर(Anil Kapoor) यांचा 'जुग जुग जिओ' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर भीम सिंगच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात तो पती आणि वडिलांच्या भूमिकेत आहे. त्याची कॉमेडी तुम्हाला माहिती आहेच.

सध्या बातमी येत आहे की लवकरच अनिल कपूर हे देखील 'नो एन्ट्री 2' ची शूटिंग सुरु करू शकतात. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार अनिल कपूरने अनीस बज्जीच्या 'नो एंट्री' या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी होकार दिला आहे. या कॉमेडी चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार आहे. त्याचबरोबर अनिल कपूरही सलमान खानसोबत चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एसकेएफ, बोनी कपूर आणि झी स्टुडिओज यांच्या संयुक्तपणे केली आहे. 'नो एंट्री 2'ची पुष्टी करताना अनिल म्हणाले की 'नो एंट्री 2' करण्यात येत आहे.

प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत आहेत. हे खूप छान होईल आणि मी फ्रँचायझीमध्ये परत येण्यास उत्सुक आहे. अनीस बज्मी आणि सलमान लवकरच शूटिंगची तारीख निश्चित करणार आहेत. आम्ही तुम्हास सांगू इच्छितो की 'नो एन्ट्री' 2005 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त अनिल कपूर, फरदीन खान, ईशा देओल, लारा दत्ता आणि सेलिना जेटली दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. दरम्यान अनीस बज्मीने अल्पावधीतच 'भूल भुलैया 2' हा ब्लॉकबस्टर दिला ज्यात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अनिल कपूरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर 'नो एंट्री में एंट्री' व्यतिरिक्त तो 'फाइटर' आणि 'अॅनिमल'मध्ये दिसणार आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल यांच्याशिवाय अनिल कपूर देखील दिसणार आहेत.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result