amruta khanvilkar, prajakta mali Team Lokshahi
मनोरंजन

‘चंद्रमुखी' चित्रपटामध्ये पाहायला मिळणार प्राजक्ता व अमृताची जुगलबंदी...

सोशल मीडियावर केवळ चंद्रा या एकाच व्यक्तीरेखेची चर्चा रंगली

Published by : Saurabh Gondhali

अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक (prasad oak ) याने 'चंद्रमुखी' (chandramukhi) या आगामी चित्रपटाची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर केवळ चंद्रा या एकाच व्यक्तीरेखेची चर्चा रंगली आहे. आपल्या मोहमयी रुपाने, अदांनी आणि नृत्यकौशल्यांना अनेकांना प्रेमात पाडणाऱ्या या चंद्राची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilkar) साकारत आहे. विशेष म्हणजे या चंद्राचा सामना करण्यासाठी तिच्यासमोर अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) उभी आहे. या दोघींमध्ये 'चंद्रा'वर  रंगलेली जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

‘’ या चित्रपटात आम्ही श्रृंगारिक लावणी, बैठकीची लावणी, सवाल जवाब असे लावणीचे विविध प्रकार हाताळले आहेत. या निमित्ताने लोककलेचा समृध्द वारसा पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘चंद्रमुखी’तील इतर गाण्यांप्रमाणे सवाल जवाबची रंगलेली ही चुरसही रसिकांना भावेलत’’ असं प्रसाद ओक म्हणाला.

दरम्यान, प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार आहेत. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत फ्लाईंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाईटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे