दरवर्षी बाप्पाचा सण उत्साह, चैतन्य आणि नवी आशा घेऊन येतो. गतवर्षपासून संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे सावट पसरले असल्यामुळे शासनाचे कोणत्याही सार्वजनिक उत्सवाबाबत नियमावली जाहीर केली. यानुसार बाप्पाच्या उत्सवावर नियमांचे बंधन आले. इतकेच काय तर बाप्पाच्या मूर्तीवर देखील बंधन आले. परंतु भक्तीवर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे जो तो आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा करण्यास सज्ज आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्याच्या छंद विषयी आपण सारेच परिचित आहोत. टाइम्स म्युझिक स्पिरीच्युअल निर्मित बाप्पाच्या स्तुतिसुमनांच्या मालिकेमध्ये अमृता फडणवीस यांचाही समावेश आहे. लाडक्या गणरायाची गणेश वंदना गात या व्हिडिओमध्ये अमृता स्वतः दिसत आहेत.
छंद आणि भक्तीचे समीकरण घेऊन अमृता फडणवीस आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक नवे गाणे घेऊन आल्या आहेत. हे गाणे नुकतेच रिलीज झाले असून टाइम्स म्युझिक स्पिरीच्युअल यांच्या अधिकृत युट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया हँडलवर आपण पाहू शकता. हे गाणे रिलीज होऊन अवघा एकच तास झाला आहे. मात्र तासाभरात या गाण्याला 2 हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी खूपच सुंदर म्हणत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या गाण्याचे क्रीएशन फिल्म फेरी प्रोडक्शनचे आहे. या गाण्याचे गायन अमृता फणवीस यांनी केले असून गाण्याचे दिग्दर्शन सचिन शिंदे आणि गौरव रेळेकर यांनी केले आहे. तबला सत्यजित जामसंडेकर, सतार उमाशंकर शुक्ल तर बासरी वंदन वरात काठापूरकर यांनी केले आहे. कोरसमध्ये उमेश जोशी, विजय धुरी, जनार्दन धात्रक, अदिती प्रभुदेसाई, पर्ण निमकर आणि मृणमयी दांडके या गायकांनी दिला आहे.