PS-1 Teaser  Team Lokshahi
मनोरंजन

PS-1 Teaser : अमिताभ बच्चन करणार सून ऐश्वर्याच्या चित्रपटाचा टीझर रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय चार वर्षांनंतर मणिरत्नमच्या 'पोनियिन सेल्वन 1' म्हणजेच 'PS1'मधून रुपेरी पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच या चित्रपटातील ऐश्वर्या रायचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये अभिनेत्री राणी नंदिनीच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटाचा हिंदी टीझरही प्रदर्शित होणार आहे. पण विशेष बाब म्हणजे हा टीझर अमिताभ बच्चन रिलीज करणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) चार वर्षांनंतर मणिरत्नमच्या 'पोनियिन सेल्वन 1' म्हणजेच 'PS1' (PS-1 Teaser ) मधून रुपेरी पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच या चित्रपटातील ऐश्वर्या रायचा (Aishwarya Rai) फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये अभिनेत्री राणी नंदिनीच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटाचा हिंदी टीझरही प्रदर्शित होणार आहे. पण विशेष बाब म्हणजे हा टीझर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) रिलीज करणार आहेत.

PS-1 Teaser

निर्मात्यांनी सोशल मीडियावर (social media) पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे की चित्रपटाचा हिंदी टीझर 8 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) हा टीझर सायंकाळी ६ वाजता डिजिटली रिलीज करणार आहेत. हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलुगु, कन्नड आणि मल्याळममध्ये रिलीज होईल. मद्रास टॉकीज आणि लायका प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली असून संगीत ए आर रहमान यांनी दिले आहे.

PS-1 हा कल्की कृष्णमूर्ती यांच्या 1995 च्या पोन्नियिन सेल्वन कादंबरीवर आधारित एक एपिक ड्रामा चित्रपट असून हे पुस्तक पाच भागात आहे आणि तमिळ भाषेतील महान कादंबरीपैकी एक मानली जाते. हा चित्रपट बनवण्यासाठी 500 कोटी खर्च आला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वात महागडा चित्रपट असेल.

PS-1 Teaser

या चित्रपटात विक्रम, कार्ती, ऐश्वर्या राय बच्चन, जयम रवी, शोभिता धुलिपाला आदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Economist Bibek Debroy passed away: ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन

नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; भेसळयुक्त 688 किलो मिठाई जप्त

Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात; म्हणाले...

'फडणवीसन यांच्या बाजूने असलेल्या लोकांना 'त्या' मदत करतात' राऊतांचा कोणावर निशाणा?

नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; भेसळयुक्त 688 किलो मिठाई जप्त