मनोरंजन

Raid 2: 'अमेय पटनायक' पुन्हा आयकर अधिकारी म्हणून येत आहे; अजय देवगणच्या 'रेड 2' ची रिलीज डेट जाहीर

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसाठी हे वर्ष खूप खास असणार आहे. या वर्षी त्यांचे अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Published by : Team Lokshahi

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसाठी हे वर्ष खूप खास असणार आहे. या वर्षी त्यांचे अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सिंघम फ्रँचायझी 'सिंघम अगेन'च्या पुढच्या भागाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. दरम्यान, अजयच्या आणखी एका चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे.

अजयच्या 2018 च्या हिट चित्रपट 'रेड'च्या पुढील भागाची घोषणा करण्यात आली आहे. होय, अजय देवगण 'रेड 2' मध्ये अधिकाऱ्याच्या भूमिकेत परतणार आहे. या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रेड 2' हा चित्रपट खऱ्या आयुष्यावर आधारित असेल. चित्रपटाचे पहिले पोस्टर आज शनिवारी (6 जानेवारी) जाहीर करण्यात आले आहे. या पोस्टरद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. टी-सीरीजने चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आणि लिहिले, प्रतीक्षा संपली. अजय देवगण आयआरएस अधिकारी अमेय पटनाईकच्या रुपात रेड 2 मध्ये परतला. आणखी एक सत्य घटना 15 नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर येणार आहे.

मुंबईत 6 जानेवारीपासून 'रेड 2'चे शूटिंग सुरू झाले आहे. असे सांगितले जात आहे की चित्रपटाचे शूटिंग दिल्ली, यूपी आणि राजस्थानसह अनेक ठिकाणी होऊ शकते. राजकुमार गुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 'रेड'च्या पहिल्या भागाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांच्याच हातात होती. चित्रपटाच्या पहिल्या भागाबद्दल सांगायचे तर, 'रेड' हा 1980 च्या दशकात सरदार इंदर सिंग यांच्यावर आयटी अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यावर आधारित होता. हे छापे तीन दिवस आणि दोन रात्री चालले, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध मालमत्ता जप्त करण्यात आली.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी