Allu Arjun Team Lokshahi
मनोरंजन

अल्लू अर्जुन ठरला बिग बजेट कलाकार ; 'पुष्पा 2' साठी घेतली एवढी फी

देशातील सर्वात महागड्या कलाकारांमध्ये अल्लू अर्जुन दुसऱ्या क्रमांकावर....

Published by : prashantpawar1

कोरोना काळात आलेल्या 'पुष्पा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुनामी आणली होती. त्याचबरोबर अल्लू अर्जुनला या चित्रपटाने रातोरात सुपरस्टार बनवले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. त्याचबरोबर या चित्रपटाच्या कथानकापासून ते गाण्यांपर्यंत लोकांमध्ये प्रचंड क्रेझ होती आणि आजही आहे. नुकत्याच झालेल्या रश्मीका मंदना हिच्या 'गुडबाय' चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज दरम्यान तिने पुष्टी केली आहे की पुष्पाच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत आता या चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन याने या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी फी मागितली आहे. आणि मेकर्सनेही त्याला होकार दिला आहे. तर जाणून घेऊया फायर अल्लू अर्जुनने चित्रपटासाठी किती फी मागितली आहे.

फायर अल्लू अर्जुनची फी 120 कोटींहून अधिक

मीडिया रिपोर्टनुसार अल्लू अर्जुनने 'पुष्पा 2'साठी 120 कोटींची भरमसाठ फी गोळा केली आहे. या संपूर्ण 120 कोटींमध्ये अनेक चित्रपट तयार होतात. मात्र एवढी फी वसूल करूनही तो बॉलिवूडच्या दबंग खानला मात देऊ शकला नाही. फक्त त्याने स्पर्धा दिली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये सलमानने त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटासाठी 125 कोटी रुपये देखील घेतले आहेत.

'पुष्पा 2 द रुल' 450 कोटी बजेटमध्ये बनणार

काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला होता की सुकुमार या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला यासाठी 75 कोटी रुपये मिळत आहेत. हे बरोबर असेल तर चित्रपटाच्या एकूण बजेटमधून सुमारे 200 कोटी रुपये दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेत्याच्या खात्यात जात आहेत. 'पुष्पा 2 द रुल'च्या निर्मितीवर सुमारे 450 कोटी रुपये खर्च होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त या चित्रपटात रश्मिका मंदान्नाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव