Akshay Kumar Team Lokshahi
मनोरंजन

'बोलो जुबान केसरी'साठी अक्षयनं मागितली माफी; म्हणाला, "ते पैसे मी..."

Akshay Kumar मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ट्रोल होतोय.

Published by : Saurabh Gondhali

बॉलिवूडचा स्टार ॲक्टर खिलाडी का खिलाडी असे ज्याला म्हटले जाते त्या अक्षय कुमारने AKSHAY KUMAR चाहत्यांची माफी मागितली आहे. असे काय घडले की त्याला आपल्या चाहत्यांची माफी मागावी लागली. त्याने एका पान मसाल्याची जाहिरात केली आहे व त्यावरून सध्या चाहते त्याच्यावर नाराज झाले आहेत. अक्षय कुमार हा एक शिस्तप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो व्यायामासाठी व शरीरासाठी खूप मेहनत घेतो. त्यामुळे फिट राहण्याकरिता तो सर्वांचा आदर्श आहे.

अक्षय कुमारने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांची माफी मागितली आहे. यात तो म्हणतो, मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागू इच्छितो. काही दिवसांपासून तुमच्या प्रतिक्रियांचा माझ्यावर खूप परिणाम झाला आहे. मी कधीही तंबाखूला प्रोत्साहन दिलं नाही आणि यापुढेही देणार नाही. विमल इलायचीच्या जाहिरातीवर तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो. त्यामुळे अतिशय नम्रतेने मी यातून माघार घेत आहे. या जाहिरातीतून मिळालेला सगळा पैसा मी एका चांगल्या कामासाठी खर्च करेन. तथापि, माझ्या कराराची कायदेशीर मर्यादा पूर्ण होईपर्यंत हा ब्रँड भविष्यातही ही जाहिरात प्रसारित करत राहील. परंतु, मी तुम्हा सर्वांना वचन देतो की, मी माझी पुढील कामं काळजीपूर्वक निवडून त्यात उत्तम काम करण्याचा प्रयत्न करेन. मी तुमचे प्रेम आणि शुभेच्छा माझ्यासोबत कायम राहाव्यात, अशी इच्छा व्यक्त करतो.

दरम्यान, अक्षय कुमारच्या या जाहिरातीमुळे त्याचे चाहते नाराज झाले होते. त्यांनी सोशल मीडियावर कमेंट्स करत अक्षयने समाजासाठी अहितकारक ठरणाऱ्या अशा जाहिराती स्वीकारू नयेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. एकीकडे अक्षय पान मसालाच्या जाहिरातीत झळकला आणि दुसरीकडे अल्लू अर्जुनने अशाच एका जाहिरातीची ऑफर नाकारल्यामुळे या दोन्ही सुपरस्टार्सच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक घमासान झालं होतं. या जाहिरातीतल अक्षय कुमारसोबत या जाहिरातीत अभिनेता अजय देवगण आणि शाहरुख खानही झळकले होते.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news