मनोरंजन

Ajay Devgn: 'रेड 2' ची रिलीज डेट पुढे ढकलण्यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या...

अजय देवगणच्या 'रेड 2' या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. 2018 साली आलेल्या रेड या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले. तर नुकताच अजय देवगणच्या 'रेड 2' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती.

Published by : Team Lokshahi

अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे नेहमीच चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण करतो. त्याचे चित्रपट हे नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडतात. सिंघम, सिंघम 2, गोलमाल, शैतान, भोला आणि दृश्यम 2 हे त्याचे चित्रपट बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरले आहेत. या चित्रपटांव्यतिरीक्त अजय देवगण अक्षय कुमारच्या सूर्यवंशी या चित्रपटात देखील शेवटी दिसला होता आणि तो शेवटचा त्याचा सिन देखील त्या चित्रपटात तो असल्याची आठवण करून देणारा ठरला. नुकताच अजय देवगणच्या 'रेड 2' या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. 2018 साली आलेल्या रेड या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले. तर नुकताच अजय देवगणच्या 'रेड 2' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. मात्र काही कारणांमुळे या चित्रपटाची रिलीज डेट ही पुढे ढकलण्यात आली आहे.

अजय देवगणचा 'रेड 2' हा चित्रपट १५ नोव्हेंबर सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता मात्र रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या शुटींगच्या कामाला काही कारणाने उशीर झाला त्यामुळे अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाची रिलीज डेट १५ ऑगस्टवरून १ नोव्हेंबर ही करण्यात आली आणि त्यामुळे राज कुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड 2' या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

तर अजय देवगण 'रेड 2' आणि 'सिंघम अगेन' या दोन्ही चित्रपटात आपला डॅशिंग अभिनय दाखवणार आहे. तर 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगणसह रणवीर सिंघ, अक्षय कुमार, करिना कपूर, दीपिका पदुकोण, टाइगर श्रॉफ तर खलनायकाच्या भूमिकेत अर्जुन कपूर हा दिसणार आहे. तसेच 'रेड 2' मध्ये खलनायकाची भूमिका गाजवायला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा आपल्या ठसेकदार अभिनयासोबत ही खलनायकाची भूमिका पार पाडताना दिसणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांना या दोन्ही चित्रपटांची उत्सुकता लागली आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय