मनोरंजन

ऐश्वर्या राय बच्चनने सोडले सासरचे घर, आराध्या बच्चनसोबत तिच्या माहेरच्या घरी शिफ्ट?

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचा नवरा आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्याबाबत अनेकदा बातम्या येत असतात की त्यांच्यात काही ठीक चालले नाही.

Published by : shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचा नवरा आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्याबाबत अनेकदा बातम्या येत असतात की त्यांच्यात काही ठीक चालले नाही. खरं तर, सर्व कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या राय बच्चन फक्त तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत दिसली आहे. आता ताज्या अहवालात ऐश्वर्या राय बच्चनने अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला सोडल्याचा दावा केला जात आहे. ऐश्वर्या राय बच्चन तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत राहत आहे. ऐश्वर्या राय बच्चन तिच्या माहेरच्या घरी म्हणजेच आई वृंदा रायसोबत राहत आहे.

रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय बच्चनने बच्चन हाऊस जलसा सोडला आहे आणि ती वेगळी राहत आहे. ऐश्वर्या राय बच्चन पती अभिषेक बच्चन आणि तिची आई वृंदा राय यांना समान वेळ देत आहे. ऐश्वर्या राय बच्चन बच्चन घर सोडून गेली असेल पण ती अजूनही पती अभिषेक बच्चनसोबत आहे. रिपोर्टमध्ये असे म्हंटले आहे की ऐश्वर्या राय बच्चन तिची सासू जया बच्चन यांच्याशी बोलत नाही आणि त्यामुळे कुटुंबात भांडणे होत आहेत.

त्याचवेळी जलसामध्ये तीची ननद श्वेता बच्चन कायमस्वरूपी शिफ्ट झाल्यामुळे भांडण वाढले आहे. या सगळ्यामध्ये, अभिषेक बच्चनसाठी हा खूप आव्हानात्मक काळ आहे कारण त्याला पती आणि मुलगा दोघांच्याही जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार नाहीत.

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने 'द आर्चिज' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला ऐश्वर्या राय बच्चनही पोहोचली आणि तिची मुलगी आराध्या बच्चन आणि पती अभिषेक बच्चनसोबत पोज दिली.

यावेळी आराध्या बच्चन तिची आई ऐश्वर्या राय बच्चनसोबत अधिक मैत्रीपूर्ण दिसली, तर वडील अभिषेक बच्चन देखील तिच्यासोबत दिसले. त्यामुळे बच्चन कुटुंबात सर्व काही ठीक नसल्याचा अंदाज लावला जात आहे.

भाकर, बेसन खाऊन, जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी

Diwali 20224 : दिवाळीत कोणत्या तेलाचा दिवा लावावा? होतील अनेक शुभ काम

सुहास कांदे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला

Harshvardhan Patil : मला विश्वास आहे, महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल

Sada Sarvankar CM Shinde Meet:सरवणकरांना मुख्यमंत्र्यांचा अल्टिमेटम, शिंदेंसोबतच्या चर्चेत काय ठरलं?