मनोरंजन

“द काश्मीर फाइल्सनंतर” आता “आरआरआर”ची सुनामी

Published by : Team Lokshahi

RRR हा मॅग्नम ओपस (Magnum Opus) चित्रपट दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर प्रदर्शित झाला आहे. एसएस राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर box office धुमाकूळ घालेल की नाही
याचा अंदाज तुम्ही या चित्रपटाला सोशल मीडियावर (social media) मिळणाऱ्या रिव्ह्यूंवरून (reviews) लावू शकता. बाहुबली 2 नंतर राजामौलीचा हा पहिलाच चित्रपट आहे, हे देखील या चित्रपटाचे महत्त्वाचे कारण आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केला आहे.

बॉलीवूडचे अभिनेते दिग्गज अजय देवगण (Ajay Devgan) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनीही आरआरआरमध्ये RRR महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. साऊथपासून South बॉलिवूडपर्यंतच्या स्टार्सनी भरलेला हा चित्रपट लोकांना कसा वाटतो? सुरुवातीची प्रतिक्रिया पाहिली तर राजामौली यांच्या चित्रपटाला लोक पसंत करत आहेत. असे बरेच लोक आहेत ज्यांनी राजामौलीच्या (एसएस राजामौली) आरआरआरला बाहुबलीपेक्षा (Bahubali) चांगले सांगितले आहे. लोक म्हणतात की आरआरआर हि मास्टरपीस (Masterpiece) आहे.

एपिक पीरियड अॅक्शन ड्रामा केव्ही विजयेंद्र प्रसाद (Vijayendra Prasad) यांनी चित्रपट लिहिला आहे. ही कथा आहे दोन भारतीय क्रांतिकारकांची. अल्लुरी सितारामा राजू आणि कोमाराम भीम यांनी ब्रिटीश राजवट – हैदराबादच्या निजामाविरुद्ध युद्ध केले. हे एक काल्पनिक नाटक आहे. जे 1920 ला सेट केले आहे. भीम आणि अल्लुरी यांच्या जीवनातून प्रेरित आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रीया पाहता, आरआरआर बॉक्स ऑफिसवर जादु निर्माण करणार असल्याचे दिसते. द काश्मीर फाइल्सनंतर आता आरआरआरची सुनामी येणार आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result