2024 सालचा पहिला ब्लॉकबस्टर ठरलेल्या हनुमान या चित्रपटाने दक्षिण भारतात तसेच हिंदी पट्ट्यात प्रचंड धुमाकूळ घातला आहे. केवळ भारतामध्येच नाही तर अनेक देशांमध्येही या चित्रपटाने चांगला व्यवसाय करुन दिग्गजांना आश्चर्यचकित केले. या चित्रपटाने जगभरातील बॉक्सऑफिसवर 295 कोटींची कमाई केली होती.
त्याचप्रमाणे आता हा चित्रपट जपानमधील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्याच्या तयारीत आहे. प्रशांत वर्मा दिग्दर्शित हा चित्रपट थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट भारतातही निवडक स्क्रीन्सवर रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट जपानमध्ये याच वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आरआरआर आणि सालारनंतर जपान दक्षिण भारतीय चित्रपटांसाठी चांगली बाजारपेठ म्हणून उदयास आले आहे, असे दिग्दर्शकाचे मत आहे. नुकत्याच झालेल्या एका संवादात प्रशांतने जपानमध्ये हा चित्रपट चांगला व्यवसाय करेल अशी आशा व्यक्त केली.
हनुमान हा या वर्षीचा भारतातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा तेलगू चित्रपट आहे आणि आतापर्यंतचा आठवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट देखील प्रशांत वर्माच्या सिनेमॅटिक विश्वाचा पहिला हफ्ता आहे. त्याच्या सिक्वेलचे काम वेगाने सुरु आहे. त्यात तेजा सज्जा आणि अमृता अय्यर मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. तर वरलक्ष्मी सरथकुमार आणि विनय राय यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. चित्रपटाच्या कथेसोबतच त्याचे व्हीएफएक्सही प्रेक्षकांना खूप आवडले.