मनोरंजन

27 वर्षांनंतर 'मेजर कुलदीप' झळकणार 'बॉर्डर'वर; बहुप्रतिक्षीत 'BORDER 2' सिनेमाचा धडाकेबाज टीझर लॉन्च

अभिनेता सनी देओलने आज 13 जून रोजी त्याचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'बॉर्डर 2'ची घोषणा केली आहे.

Published by : Dhanshree Shintre

अभिनेता सनी देओलने आज 13 जून रोजी त्याचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'बॉर्डर 2'ची घोषणा केली आहे. त्याने 12 जून रोजी सांगिलतं होतं की, उद्या म्हणजेच आज 13 जून रोजी चाहत्यांसाठी तो एक रोमांचक बातमी घेऊन येत आहे. बॉर्डर 2 चित्रपटावर जोरदार काम सुरु आहे. आज या चित्रपटाची टीझरची घोषणा करण्यात आली आहे. 'बॉर्डर' चित्रपट 13 जून 1997 रोजी प्रदर्शित झाला होता. सनी देओलने चित्रपटसृष्टीत 2023 मध्ये 'गदर 2' चित्रपटाद्वारे पुनरागमन केलं होतं. 'गदर 2' च्या यशानं सनी देओलला बॉलिवूडमधून अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत.

सनी देओलकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत, ज्यात 'सफर', 'लाहोर 1947', 'बॉर्डर 2' आणि 'गदर 3' या चित्रपटाचा समावेश आहे. टीझरमध्ये सनी देओल म्हणतोय, "27 वर्षांपूर्वी एका सैनिकानं वचन दिलं होतं की तो परत येईन, ते वचन पूर्ण करण्यासाठी तो पुन्हा भारताच्या मातीला सलाम करण्यासाठी येत आहे." 'बॉर्डर 2'ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता करत आहेत. अनुराग सिंग 'बॉर्डर 2' चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाला अनु मलिक आणि मिथुन संगीत देणार आहे. या चित्रपटासाठी जावेद अख्तरनं गाणी लिहिली आहेत. या गाण्यांना सोनू निगम गाणार आहे. सध्या या चित्रपटाची स्टारकास्ट समोर आलेली नाही.

आता, याच 'बॉर्डर'चा सिक्वेल बॉर्डर-2 प्रदर्शित होणार आहे. 'गदर-2'मधून बॉलिवूडमध्ये झोकात पुनरागमन करणारा अभिनेता सनी देओलने 'बॉर्डर-2'चा अनाउंसमेंट टीझर लाँच केला आहे. 'बॉर्डर-2'मध्ये सनी देओलची मुख्य भूमिका असणार आहे. हा बॉलिवूडचा मोठा युद्धपट असणार असल्याची चर्चा आहे.

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे