देश आणि विदेशात मराठी चित्रपट हे रसिकप्रेक्षकांवर भुरळ घालताना दिसत आहे. 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड', 'शेर शिवराज' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी अशा ऐतिहासिक कथावर अधारित सिनेमे गेल्या काही दिवसांपासून सुरू केले आहेत. सातासमुद्रपार या चित्रपटांना चांगली पसंतीही मिळत आहे. तसेच मराठी सिनेमाच्या प्रेमात बॉलिवूडमधील अनेक कलाकार पडले आहे. या कलाकारांमध्ये रविना टंडन (RaveenaTandon) हिचेही नाव समोर आले आहे. तिने तिच्या ट्विटर वरून तिला 'पावनखिंड' सिनेमा खूप आवडला हे सांगितले आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन ही सोशल मिडियावर (Social Media) सक्रिय असते. तिने तिच्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये रविना टंडन म्हणाली की, 'नुकताच मी 'पावनखिंड' सिनेमा मी पाहिला. आणि तो मला खूप खूप आवडला.' असे तिने ट्विट केले
'पावनखिंड' हा चित्रपट मराठ्यांच्या इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'पावनखिंड'च्या मोहिमेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्ददर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे.अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांनी मातोश्री जिजाऊसाहेब यांची प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिका साकारत आहे तर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका अजय पूरकर साकारत आहे. आस्ताद काळे, प्राजक्ता माळी यांची 'पावनखिंड' या सिनेमात छोट्या भूमिका असल्या तरी त्या लक्षात राहणाऱ्या आहेत.