बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मोठ्या अडचणीत सापडली आहे. सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandrasekhar)संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने जॅकलिनची 7.12 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.
राजकीय नेत्यांवर कारवाई करणाऱ्या ईडीचा (ED)आता बॉलिवूडलाही दणका दिला आहे. तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याच्याशी संबंधित मनी लाँडरिंगच्या प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिची 7.27 कोटींची संपत्ती ईडीने जप्त कलेली आहे. या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आता जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. सुकेशने बहरीनमध्ये राहणाऱ्या जॅकलिनच्या आई-वडिलांना आणि अमेरिकेत राहणाऱ्या तिच्या बहिणीला महागड्या कार दिल्याचंही समोर आलं आहे. शिवाय जॅकलिनच्या भावाला 15 लाख रुपये दिल्याचीही माहिती आहे.
दिल्लीच्या तुरुंगात असताना सुकेशने एका महिलेची 215 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्यानंतर याच खंडणीच्या पैशातून सुकेशने जॅकलिनला करोडोंच्या महागड्या भेटवस्तू दिल्या. यामध्ये हिरे, दागिने, 52 लाखांच्या घोड्यासारख्या महागड्या भेटवस्तूंचा समावेश होता. हे सर्व पैसे सुकेशने गुन्हे करून कमावले. त्यामुळे ईडी सुकेशवर कडक कारवाई करत आहे. गेल्या एक वर्षापासून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. सुकेशच्या फसवणुकीप्रकरणी जॅकलिनची ईडीने अनेकदा चौकशी केली आहे.
काय आहे जॅकलिन आणि सुकेशचं नातं
जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांच्या दोघांची मैत्री मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यांच्या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोघांचं नातं मैत्रीच्या पुढे असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.