मनोरंजन

अभिनेता वरुण धवनला झालेल्या ‘वेस्टिब्युलर हायपोफंक्शन’ हा आजार नेमका काय आहे?

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या 'भेडिया' चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. 'भेडिया'मध्ये वरुण धवनसोबत क्रिती सेननही दिसणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या 'भेडिया' चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. 'भेडिया'मध्ये वरुण धवनसोबत क्रिती सेननही दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला जो चाहत्यांना खूप आवडला आहे. सध्या कलाकार या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. त्याच वेळी, आता वरुण धवनने खुलासा केला आहे की तो एका दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे, हा आजार ज्यामध्ये व्यक्ती शरीराचा तोल गमावतो. वरुण धवनने एका मुलाखतीत सांगितले की, 'कोविडच्या गोष्टी सामान्य होऊ लागल्या. लोक कामासाठी उंदीर-मांजरांसारखे धावू लागले, मला वाटतं लोक आता पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करत आहेत. माझ्याबद्दल सांगायचे तर, मी माझ्या जुग जुग जिओ या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी मी स्वत:वर इतका दबाव का टाकला हे मला कळत नाही.

वरूण धवन पुढे म्हणतो की, पण अलीकडे मी थांबलो आहे. मला माहित नाही मला काय झाले आहे? मला वेस्टिब्युलर हायपोफंक्शन नावाच्या आजाराचे निदान झाले आहे, ज्याने मला खूप त्रास दिला आहे. पण असे असूनही मी खूप मेहनत घेतली आहे. आपण सगळे एका शर्यतीत आहोत. मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात एक उद्देश असतो. मी माझे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि आशा आहे की लोकही असेच करतील. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या मते वेस्टीबुलर हायपोफंक्शन या आजारामुळे शरीराचा तोल जातो. या आजाराचा परिणाम कानावर तसेच मेंदूवरही होतो. वेस्टिब्युलर सिस्टीम मुख्यतः कान, डोळे व मेंदूच्या स्नायूंवर प्रभाव करते, जेव्हा यापैकी कोणताही घटक योग्य काम करत नाही तेव्हा या त्रुटींचा मेंदूला संदेश पाठवला जातो परिणामी चक्कर येऊ शकते. हा त्रास एका बाजूच्या कानात होत असल्यास त्यास युनिलॅटरल हायपोफंक्शन तर दोन्ही बाजूस होत असल्यास बाय लॅटरल हायपोफंक्शन असे म्हणतात.

वेस्टिब्युलर हायपोफंक्शनची लक्षणे ही कारणांवर अवलंबून असतात. अनेकांना चक्कर येणे, मळमळ, शरीराचा तोल जाणे, गर्दीच्या ठिकाणी आणि अंधाऱ्या खोलीत चालता न येणे, वेगवाण हालचाल झाल्यास चक्कर येणे असे लक्षण दिसून येते. अनेकांना पटकन बसल्या जागेवरून उठल्यावर किंवा एखादी वस्तू वेगाने डोळ्यासमोरून गेल्यावर डोके चक्रावून गेल्यासारखे वाटते. हा वेस्टीबुलर हायपोफंक्शनचा परिणाम असतो. वेस्टिब्युलर हायपोफंक्शनचा त्रास नियंत्रित ठेवण्यासाठी फिजिओथेरपिस्टचे मार्गदर्शन घेणे हिताचे ठरेल. तुम्हाला शरीराचा तोल सांभाळण्यासाठी विविध व्यायाम करायला सांगितले जाऊ शकते. एकदा का शरीराचा तोल सांभाळता आला की नियमित व्यायामाने आपण अन्यही त्रासांवर आराम मिळवू शकता.

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका