बिग बॉस फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) यांची आई आणि 'जोग एज्युकेशन ट्रस्ट'च्या संचालिका सुरेखा जोग सुरेखा जोग (Surekha Jog) यांच्याविरूद्धात आणि पुणे जिल्हा परीषदेच्या तीन अधिकाऱ्यावर बंडगार्डन पोलीस स्थानकात (Bundgarden Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'जोग एज्युकेशन ट्रस्ट'च्या (Jog Educational Trust) अकरा शाळांसाठी शिक्षण अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करण्यात आल्या आणि स्वमान्यता प्रमाणपत्र तयार करण्यात केली असून कोट्यावधी रुपयांची घोटाळा करून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांच्याविरूद्धात बंडगार्डन पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच जोग यांच्यासह पुणे जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात अजून जिल्हा परिषदेचे आणखी काही बडे अधिकारी असल्याने त्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या आधीही अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये 'जोग एज्युकेशन ट्रस्ट'च्या अध्यक्षा सुरेखा जोग, अभिनेता पुष्कर जोग आणि शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्यावर कोथरूड (Kothrud) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाने चित्रपट क्षेत्रामध्ये आणि पुण्यातही खळबळ उडाली होती.