मनोरंजन

ड्रग्स प्रकरणात अभिनेता अरमान कोहली याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Published by : Lokshahi News

अभिनेता अरमान कोहली याला मुंबईतील न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अरमान कोहली याच्या मुंबईतील घरात ड्रग्ज जप्त केल्यानंतर NCB ने त्याला अटक केली होती. (Actor Arman Kohli has been remanded in judicial custody for 14 days in a drug case) अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणातील धाडीचं सत्र सुरू झालं आहे. आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींची ड्रग्ज प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. अरमान कोहली याला मुंबई न्यायालयाने तब्बल 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB) टीमने शनिवार सकाळी एका ड्रग पेडलरला अटक केली होती.

नक्की काय आहे प्रकरण
या पेडरलचे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. गुप्त सूचनेच्या आधारावर एनसीबीने बॉलीवुड अभिनेता अरमान कोहली याच्या घरावर छापेमारी करण्यात आली. झोनल डायरेक्टर समीर वानखेड़े यांच्या मार्गदर्शनाखाली ही छापेमारी करण्यात आली. ड्रग पेडलरसोबत संबंध असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर अरमान कोहलीच्या घरावर छापेमारी करण्यात आली. (NCB raid on Bollywood actor Arman Kohlis house Action after investigation of drug peddler ) त्याच्या घरात ड्रग्ज सापडल्यानंतर एनसीबीने आपली कारवाई अधिक कडक केली आहे.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news