Abhay Deol Lokshahi Team
मनोरंजन

Abhay Deol; एका दिग्दर्शकाने माझ्याबद्दल खोटी अफवा पसरवली...

एका मुलाखती दरम्यान अभयने सांगितली हकीकत

Published by : prashantpawar1

बॉलिवूडमध्ये काही चेहरे असे देखील आहेत जे स्टारकीड्स असून देखील अधिक प्रमाणात नामांकित नाहीत. 'सोचा ना था' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (bloywood )पदार्पण करणाऱ्या अभय देओल(abhay deol) या अभिनेत्याने 'आयशा' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' यासारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. परंतु दुर्दैवाने तो इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे नाव कमवण्यात यशस्वी होऊ शकला नाही. अभय चित्रपटाच्या पार्श्वभूमीतून आला आहे. त्याचे वडील अजित देओल यांनी हिंदी शिवाय पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर धर्मेंद्र हे त्यांचे वडील आहेत. असे असूनही अभयला इंडस्ट्रीत खूप संघर्ष करावा लागला. इतक्या वर्षांनंतर आता अभयने चित्रपटसृष्टीतील सत्य समोर आणले आहे.

एका मुलाखतीत अभय देओलने सांगितले की, 'फिल्म दुनियेत फक्त चांगला अभिनय करणं गरजेचं नाही तर स्वत:ची प्रसिद्धी असणंही खूप महत्त्वाचं आहे. यासोबतच दिग्दर्शकाने त्याच्याबद्दल खोट्या अफवा कशा पसरवल्या याचा खुलासा अभिनेत्याने केला.

अभय देओलने एक मुलाखतीत सांगितलं की आज 17 वर्षांनंतरही मला असं वाटतं की मी बॉलिवूडमध्ये कुठेही फिट नाही. मला नेहमी वाटायचे की लोकांना माझ्याबद्दल सांगणे किती वाईट आहे पण आता मला कळले की स्वतःला नेहमी अपडेट ठेवणं किती महत्त्वाचं ठरतं. जेव्हा तुम्ही गप्प बसता तेव्हा लोकांच्या नजरेत तुमचे अस्तित्वच संपते. माझी चूक एवढीच आहे की मी याआधी लोकांना माझ्याबद्दल सांगितले नाही.

अभयने असं देखील सांगितलं की चित्रपट उद्योगात खूप गटबाजी आहे त्यामुळे मी इथे रमू शकलो नाही. मला वाटतं की प्रत्येकाला याबद्दल माहिती आहे. एक काळ असा होता की जेव्हा एखादा दिग्दर्शक माझ्याबद्दल जाहीरपणे वाईट बोलायचा आणि खोट्या अफवा पसरवायचा. जेव्हा तुम्ही एखाद्यासमोर मन मोकळे करता आणि इतरांच्या वेषात पडता तेव्हा लोक तुमचा गैरफायदा घेऊ लागतात. एका दिग्दर्शकाने माझ्याबद्दल खूप खोटं पसरवल्याचं मला चांगलं आठवतं. या सर्व गोष्टींसाठी तुम्ही तयार असले पाहिजे.

विशेष म्हणजे अभय ज्युनियर रग्बी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या आदिवासी मुलांच्या सत्यकथेवर चित्रपट घेऊन येत आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे जो 2007 च्या भारताच्या अंडर-14 रग्बी संघाच्या विश्वचषक विजयावर आधारित आहे.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती