भारतीय विवाह संस्था ही एक जगातील आदर्श विवाह संस्था मानली जाते. मात्र आधुनिक जीवनशैली नुसार पती पत्नी या नात्याचे स्वरूप बदलत आहे पारंपरिक पद्धती बदलून आजच्या तरुणाईचा लग्न आणि वैवाहिक आयुष्याकडे पाहण्याचा नवीन दृष्ट्टीकोन तयार होत आहे.याला अनेक घटक कारणीभूत आहेत जसे बदलती जीवनशैली, गरजा, करिअर, याला प्राधान्य देताना गरज असलीतरी देखील लग्न किंवा जोडीदार हा विचार प्राधान्यक्रमामध्ये उशिरा येऊ लागला आहे. यामध्ये तरुणांना बंधनांपेक्षा मुक्त असणे जास्त सोयीस्कर वाटू लागले आहे.
त्यामुळे लग्न न करताच प्रेम असेल तर लिव्ह इनमध्ये एकमेकांसोबत राहणं, लग्न झालं असलं तरी प्रेम कमी झालं म्हणून सामंजस्याने विभक्त होणं, लग्नाचा सोबती असला तरी परस्पर समंतीने विवाहबाह्य संबध ठेवणं या अलिकडेच्या वेब शो आणि सिनेमांमध्ये दिसणाऱ्या गोष्टी अगदीच काल्पनिक नाहीत. समाजात असलेल्या स्थितीचंच ते प्रतिबिंब आहे.मात्र या परिस्थिती देखील अनेक जोडपी या धावपळीच्या आयुष्यात देखील काही आनंदाचे क्षण शोधत असतात असेच एक जोडपे म्हणजे नुकतेच वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले साकेत आणि जुई एमएक्स प्रेअरवर नुकताच 'आणि काय हवं?' या वेब सीरिजचा तीसऱा सिझन रिलीज झालाय. या वेब सीरिजमध्ये खऱ्या आयुष्यातील क्यूट कपल उमेश कामत आणि प्रिया बापट मुख्य भूमिका साकारत आहेत.
या आधीच्या दोन्ही सिझनमध्ये त्यांची जूई आणि साकेत ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. वरुण नार्वेकर लिखीत आणि दिग्दर्शित 'आणि काय हवं?' या वेब सीरिजमधील जुई आणि साकेत आपणच आहोत का असा भास अनेकांना या वेब सीरिजचे दोन्ही सिझन पाहताना नक्कीच झाला असले. सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये लग्नानंतर संसाराची सुरुवात तर दुसऱ्या सिझनमध्ये जुई आणि साकेतच्या लग्नाला ३ वर्ष पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलंय. या सिझनमध्ये आता जुई आणि साकेतच्या लग्नाला ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. तिसऱ्या सिझनमध्ये देशात करोना माहामारीनंतरचा लॉकडाउनचा काळ पाहायला मिळतो. मात्र यावेळी जुई आणि साकेतचं नातं अधिक दृढ आणि घट्ट झाल्याचं पाहायला मिळतंय.
या निमित्ताने नुकताच कोरोना काळात वर्कफ्रोम होम करणाऱ्या जोडप्यांना घरी एकत्र राहायला मिळाले किंवा अजून ही ज्यांचे वर्कफ्रोम होम सुरु आहे अशा जोडप्यांना ही आल्हाददायक गोष्ट कामाच्या व्यापातून एकमेकांना वेळ देण्यासाठी नक्कीच आवडणारी ठरेल.