मनोरंजन

देशमुखांना मोठा धक्का! देशमुखांच्या घरातील आणखी एक घटस्फोट अरुंधती थांबवू शकेल?

'आई कुठे काय करते' मालिकेत आता एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Published by : Team Lokshahi

'आई कुठे काय करते' मालिकेत रोज नवीन ड्रामा पाहायला मिळतो. मालिका ही खूप रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. प्रेक्षक रोज न चुकता मालिका पाहतात. मालिकेत आता एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेत संकट काही संपता संपत नाही. एकामागोमाग संकट येताना दिसत आहेत. ईशा-अनिशने पळून जाऊन लग्न केल्यानंतर आता देशमुखांच्या घरात आणखी एक घटस्फोट होणार आहे.

त्यांनंतर विशाखाला गुपचूप रडताना पाहून अरुंधतील नेमकं कळत नाही की तिच्या आयुष्यात काय झालं आहे का? तेव्हा विशाखा उडवाउडवीची उत्तरं देत सांगते की दादा (अनिरुद्ध) ईशाशी असं वागला या गोष्टीचा ती विचार करते आहे. ईशावर जीव असूनही तो असं का वागतोय याचा अर्थच तिला लागत नसतो. अरुंधती म्हणते की, बऱ्याच पुरुषांना आपला हळवेपणा समोरच्यांना दाखवणं म्हणजे आपली हार वाटते. समोरच्याला माफ करणं म्हणजे स्वत:चा कमीपणा वाटतो. म्हणून स्वत:भोवती कठोरपणाचं कवच तयार करतात, असंच अनिरुद्धंचं झालं आहे. तेव्हा विशाखा म्हणते की सगळ्या पुरुषांना आपल्या माणसांपेक्षा स्वत:चा अहंकार का मोठा वाटतो?

अरुंधतीला नेमकं कळत नाही 'सगळ्या पुरुषांबद्दल' म्हणजे विशाखा नेमकं कोणाबद्दल बोलते आहे. ते पुन्हा एकदा विशाखाला विचारते की सगळं ठीक आहे ना? अप्पाही विशाखाला असंच विचारतात, मात्र ती त्यांच्याशीही नीट बोलत नाही. तिच्या बोलण्याचा-वागण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न अरुंधती करत असते. एपिसोडच्या शेवटी ईशा आणि अनिश यांच्यामध्ये एखाद्या नवरा बायकोप्रमाणे संभाषण पाहायला मिळतं.

ईशाचे लग्न कोणताही अडथळा पडता पार पडणार का? विशाखा आणि केदारचा डिव्होर्स होणार का? या सगळ्याचा देशमुख आणि केळकर कुटुंबावर काय परिणाम होणार? हे पाहण रंजक ठरणार आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका